Pune Kalyani Nagar Accident Latest News : कल्याणीनगर अपघात प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहे. आरोपी अल्पवयीन मुलाचे ब्लड सँपल कचऱ्यात फेकण्यासाठी ससूनमधील डॉक्टरांनी लाच घेतल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर डॉ. तावरे आणि हळनोर यांना बेड्या ठोकण्यात आल्या. त्याशिवाय शिपाई घटकांबळे यालाही अटक केली. या तिघांना कोर्टात हजर केले असता न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटकांबळे हा तावरेंसाठी दलाल म्हणून काम करत होता. 


4 दिवसांची पोलीस कोठडी - 


ससून रुग्णालय अल्पवयीन आरोपी ब्लड सँपल फेरफार प्रकरणी डॉ.अजय तावरे, डॉ.श्रीहरी हाळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांना चार पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे सत्र न्यायालयातील न्यायाधीश पांडे यांनी दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर तिन्ही आरोपींना 30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीत विशाल अग्रवाल आणि डॉ अजय तावरे, डॉ.श्रीहरी हाळनोर अतुल घटकांबळे यांची समोरासमोर चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. 


घटकांबळे दलाल म्हणून काम करायचा


पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरण धक्कादायक माहिती समोर आली आहे. अतुल घटकांबळे "दलाल" म्हणून करत होता, तो डॉ अजय तावरे यांचे काम करत होता. पैशांची देवाण घेवाण करण्यासाठी घटकांबळेवर तावरेने जबाबदारी दिली होती. घटकांबळेला पैसे देणारा व्यक्ती कोण? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. घटकांबलेला मिळालेल्या पैशातून त्याने डॉ हळनोर यांना  २.५ लाख रुपये दिले होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून घटकांबळेला मिळालेले पैसे जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटकांबळे हा ससून रुग्णालयातील शवगृहात शिपाई म्हणून कार्यरत होता. 


कोर्टात काय काय झालं, युक्तीवादामध्ये कोणते मुद्दे होते...  


तपास अधिकारी / सरकारी वकील यांनी काय युक्तीवाद केला.. ?


अल्पवयीन आरोपीचे रक्त नमुने बददले. डॉ अजय तावरे यांच्या सांगण्यावरून डॉ श्रीहरी यांनी नमुने बदलले. तिसरा आरोपी अतुल याने पैशांचा व्यवहार केला. 
पदाचा गैरवापर केला. त्यांची समोरासमोर चौकशी करायची आहे. शासकीय दस्त्वावेज मध्ये फेरफार केली. आरोपींनी घेतलेले पैसे हस्तगत करायचे आहेत. ससूनमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास करायचा आहे. मोबाईलमधील संभाषनाचा तपास करायचा आहे. ससूनमधील कार्यालयाचा पंचनामा करायचा आहे. 
मूळ सँपल चे काय केले, बदलण्यात आलेले रक्त कुणाचे होते? या प्रकरणाशी संबंधित गुन्ह्यात अल्पवयीन मुलाचे वडील अटकेत आहेत. या गुन्ह्यात कोण कोण सहभागी आहेत? या सगळ्याचा तपास करायचा आहे. त्यासाठी सलग 10 दिवस पोलीस कोठडी देण्यात यावी. 


आरोपीच्या वकिलांनी कोणता युक्तीवाद केला ?


आरोपीच्या वकीलांनी पोलीस कोठडीच्या मागणीला विरोध केला.  ⁠आरोपी डॅाक्टरांवर लावलेली कलमे जामीनपात्र तर काही अदखलपात्र असल्याचे सांगितले. 120 ब हे कट रचल्याचे कलम लावले आहे. पण गुन्हा आधीच घडुन गेला आहे. मुळ गुन्ह्यात यांचा काहीच संबध नाही. कट असेल तर गुन्ह्याच्या सुरवातीपासून सहभाग पाहिजे.फोर्जरीचे कलम लावले आहे. 467 पण ते इथे लागू होत नाही. हे कलम व्हॅल्युएबलसाठी लागू होतो. व्हॅलुएबलची व्याख्या कायद्यात दिली आहे. त्यात ब्लड सॅम्पल बसत नाही. 


जामीनपात्र गुन्ह्याच्या तपासासाठी अरीपोची पोलीस कोठडी आवश्यक नाही. कलम 201, 213 जामीन पात्र आहेत. कलम 467 लागू होत नाही, त्याला पोलीस कोठडीची आवश्यकता नाही. अपघाताची घटना घडून गेली आहे. आरोपींचा त्यात सहभाग नाही. त्यामुळं 120 बी लागणार नाही. सॅम्पल कुणाचे आहेत याच्याशी आमचा संबध नाही. Cctv फुटेजमध्ये छेडछाड होणार नाही. विशाल अगरवाल दुसऱ्या गुन्ह्यात आरोपी आहे. त्याचा आमचा काही संबंध नाही. आमच्याकडे असलेली सगळी माहिती दिलेली आहे. पोलीस कोठडी देण्याची गरज नाही