पुणे : आयपीएल सामन्यांवर ऑनलाइन सट्टा घेणाऱ्या टोळीवर पोलिसांची (IPL) करडी नजर असल्याचं दिसून येत आहे. आयपीएल सामन्यांवर ऑनलाइन सट्टा घेणाऱ्या टोळीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे  (Pune Police)शाखेने शहरातील उच्चभ्रू भागात कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी दहा सट्टेबाजांना (10 Arrested) अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून 16 मोबाईल, दोन लॅपटॉप असा सुमारे सव्वादोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहेय 


मुकेशकुमार शैलेंद्रकुमार साहू (वय 24), देवेंद्र कमलेशकुमार यादव (वय 21), जसवंत भूषणलाल साहू (वय 22), राहुलकुमार गणेश यादव, रोहितकुमार गणेश यादव (वय 26), दुष्यंत कोमलसिंह सोनकर (वय 23), संदीप राजू मेश्राम (वय 21), अखिलेश रुपाराम ठाकूर (वय 24), मोहम्मद ममनून इस्माइल सौदागर (वय 32), अमित कैलास शेंडगे (वय 32) या सट्टेबाजांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. यातील आरोपी साहू, यादव, सोनकर, ठाकूर, मेश्राम हे छत्तीसगडचे रहिवाशी आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकातील अधिकारी, कर्मचारी कोथरूड भागात रविवारी गस्तीवर होते. त्यावेळी भुसारी कॉलनी परिसरातील एका सोसायटीमध्ये क्रिकेटवर ऑनलाइन सट्टा सुरू असल्याची माहिती मिळाली त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने सोसायटीतील सदनिकेत छापा टाकला आणि या कारवाईत पोलिसांनी दहा सट्टेबाजांना अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. 


 सध्या सगळीकडेच आयपीएलचं फिव्हर सुरु आहे. अनेक तरुणांमध्ये आयपीएलची चांगलीच क्रेझ दिसते. त्यात आयपीएल सुरु झाली की सट्टेबाजीदेखील सुरु होते. दरवर्षी अनेकांवर अनेक शहरात सट्टेबाजांवर कारवाई केली जाते मात्र तरीही आयपीएल सुरु झाली की सट्टेबाजीदेखील तेवढ्यात जोमात सुरु होते. याच सट्टेबाजांची कुणकुण लागताच पोलीस पथक तयार करुन धडक कारवाई करण्यात येते. त्याच प्रमाणे सोमवारीकोथरुडमधील उजवी भुसारी कॉलनी परिसरातील पटेल टेरेस इमारतीत हा सट्टेबाजीचा खेळ सुरू होता. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी पथकांची स्थापना करून अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या सुचनेनुसार त्या ठिकाणी धाड टाकली. या ठिकाणी क्रिकेटच्या सामन्यावर सट्टा लावणाऱ्या 10 जणांना रंगेहात पकडण्यात आलं आहे. 


इतर महत्वाची बातमी-


इतर महत्वाची बातमी-


Nashik Swine Flu : नाशिककरांची चिंता वाढली, पुन्हा स्वाईन फ्लूचा धोका वाढला, एकाचा मृत्यू तर दोघांवर उपचार सुरू


फडणवीसांकडून आमदारकीची ऑफर, उत्तम जानकर काय भूमिका घेणार? 19 एप्रिलला निर्णय जाहीर करणार