पुणे : पुणेकरांवर पाणी टंचाईचं(Pune water Crisis) भीषण संकट आहे त्यामुळे पुणेकरांवर पाणी जपून वापरण्याची वेळ आली आहे. पुणे शहराला जेमतेम 45 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. पुणे शहराला पुरवठा (Pune water Issues) करणाऱ्या धरणांत  केवळ 10.22 टीएमसी इतकाच  पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात (water Crisis In Summer) पुणेकरांवर पाण्याचं संकट ओढवण्याची शक्यता आहे. 


पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून सध्या केवळ 10.22 टीएमसी इतका अल्प पाणीसाठा शिल्लक आहे. मे आणि जून या दोन महिन्यात पुणेकरांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे  लागण्याची शक्यता आहे. शहराला खडकवासला प्रकल्पांतील खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या धरणांमधील पाण्याद्वारे पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो या चार धरणांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठा हा 29.15 टीएमसी आहे. यापैकी सध्या या धरणांमध्ये सध्या केवळ 10.22 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. 


पुणे जिल्ह्यातील परिस्थीती पाहिली तर तीव्र दुष्काळाचे सावट आहे. जिल्ह्यात एकूण 10 तालुक्यांमध्ये पाणी टंचाई आहे. त्यामुळे एकूण 13 तालुक्यांपैकी 10 तालुक्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील पुरंदर बारामती जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात भीषण पाणीटंचाई आहे. जिल्ह्यात जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये 148 पेक्षा अधिक टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यासोबतच जिल्ह्यातील अनेक नद्यादेखील कोरड्या पडल्या आहेत. 


पुण्यातील अनेक सोसायट्यांमध्ये महापालिकेचं पाणी येत नाही. त्यामुळे ज्या दिवसांपासून पुण्यातील नागरिकांनी घर घेतलं आहे. त्या दिवसापासून पुण्यातील अनेक नागरिकांनाच्या घरात महापालिकेचं पाणी  येत नाही. त्यामुळे नागरिकांना पहिल्या दिवसापासून पाणी विकत घ्यावं लागत आहे. याच कारणामुळे आम्ही फक्त टॅक्स भरतो पण महापालिकेचं पाणी येत नसल्याची खंत नागरिकांनी बोलून दाखवली आहे. पुण्यातील नागरिकांवर पाण्यासाठी पाण्यासारखा पैसा ओतण्याची वेळ आली आहे. त्यातच प्रत्येक सोसायटीला साधारण 4 ते साडे चार लाख लाख रुपयांचं पाणी विकत घ्यावं लागत आहे. रोज 20 टॅंकर पाणी विकत घ्यावं लागत आहे. महापालिकेने पाण्याचं कनेक्शन दिलं मात्र आतापर्यंत दोनवेळाच पाणी आलं आहे, असंही नागरिकांनी सांगितलं आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Nashik Swine Flu : नाशिककरांची चिंता वाढली, पुन्हा स्वाईन फ्लूचा धोका वाढला, एकाचा मृत्यू तर दोघांवर उपचार सुरू


फडणवीसांकडून आमदारकीची ऑफर, उत्तम जानकर काय भूमिका घेणार? 19 एप्रिलला निर्णय जाहीर करणार