पुणे (इंदापूर) : इंदापूर-अहिल्यानगर रोडवरील मदनवाडी गावाच्या हद्दीत पुलाखाली गरोदर महिलेचा कुजलेला मृतदेह दोन दिवसांपूर्वी आढळला (Indapur Crime News) होता. तिच्या डाव्या हातावर "रविराज" असा टॅटू होता. त्यावरून २४ तासांत खुनाचा उलगडा करीत पोलिसांनी रविराज जाधव (रा. आष्टी, जि.बीड) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविराज प्रेमविवाह (Indapur Crime News) करून बारामती येथे पत्नी सोनालीसोबत राहत होता. दोघांत पत्नीच्या अनैतिक (Indapur Crime News) संबंधावरून वाद व्हायचा. १२ ऑक्टोबरला कडाक्याचे भांडण होऊन रविराजने सोनालीचा खून करून मृतदेह मदनवाडी गावाच्या हद्दीत पुलाखाली पाण्यात फेकून दिला.(Indapur Crime News) 

Continues below advertisement

Indapur Crime News: पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय अन् वाद

दोन दिवसांपूर्वी भिगवण पोलीस स्टेशन हद्दीतील मदनवाडी गावाजवळ ओढ्याच्या पुलाखाली दोन दिवसांपूर्वी एका गरोदर महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली होती. पोलीस तपासानुसार, दिपाली सुदर्शन जाधव (वय 30, रा. कटफळ, ता. बारामती) हिचा विवाहबाह्य प्रेमसंबंध (Indapur Crime News) असल्याचा संशय पतीला होता. त्यावरून 12 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी घरगुती वाद झाला आणि रागात आरोपी पती सुदर्शन ऊर्फ रविराज रणजित जाधव (वय 36) याने पत्नीच्या डोक्यात लोखंडी वस्तूने प्राणघातक हल्ला करून तिचा खून केला. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने पत्नीचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून त्याच्या ज्युपिटर दुचाकीवर ठेवला आणि तो मृतदेह भिगवण-बारामती रस्त्यावरील मदनवाडी गावाजवळील ओढ्याच्या पुलाखाली फेकून दिला.(Indapur Crime News) 

Indapur Crime News: रविराज टॅटूमुळं लागली सुगावा

22 ऑक्टोबर रोजी स्थानिक पोलीस पाटलांनी पुलाखाली ब्लँकेटमध्ये बांधलेला मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना दिली. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता आणि डोक्याची कवटी फुटलेली होती. मात्र, हातावर रविराज ‘Raviraj’ असा टॅटू असल्यानं पोलिसांनी त्यावरून ओळख पटवण्यात मदत मिळाली. भिगवण पोलीस स्टेशन आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त तपास सुरू केला. तपासाच्या दरम्यान आरोपी सुदर्शन ऊर्फ रविराज रणजित जाधव याने पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार 12 ऑक्टोबर रोजी बारामती पोलीस स्टेशनला दिली होती. परंतु चौकशीत त्याच्या उत्तरात विसंगती आढळल्यानं पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. शेवटी सुदर्शनने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. 

Continues below advertisement