पुणे: सामाजिक कार्यात सक्रिय असणाऱ्या पतीनं स्वतःच्या पत्नीला नगरसेविका करण्याचं स्वप्न (Pune Crime News) तर पाहिलं होतं, पण चारित्र्याच्या संशयाने मनात घर करुन ठेवलं होतं. यातूनच दोघांमध्ये वारंवार खटके उडाले अन यातून संतापलेल्या पत्नीनं पतीचा गळा घोटला. बाप देवाघरी गेला अन आई तुरुंगात (Pune Crime News)गेली. पिंपरी चिंचवडमध्ये घडलेल्या या दुर्दैवी घटनेत दोन चिमुकली मात्र पोरकी झालीत. पिंपरी चिंचवडमधील सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईरची पत्नी चैताली भोईरने गळा घोटून हत्या केली. नकुलने पत्नीला नगरसेविका करण्याचं स्वप्न पाहिलं होतं, पण चारित्र्याच्या संशयाचे भूत त्याच्या मानगुटीवर बसलं होतं. वारंवार संशय घेतल्यानं पत्नी संतापली (Pune Crime News) अन तिने ओढणीच्या साह्यानं स्वतःच्या पतीचा गळा घोटला.(Pune Crime News) 

Continues below advertisement

Pune Crime News: त्याला दारु पिण्याचं व्यसन लागलं 

नकुल हा चळवळीतला कार्यकर्ता होता. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आजवर जी आंदोलनं झाली त्यात ते नेहमीचं सक्रिय असायचा. पण त्याला दारु पिण्याचं व्यसन लागलं आणि हिचं बाब त्याच्यासाठी धोक्याची ठरली. नकुल आणि पत्नी चैताली हे अनेकदा दोघे सोबतच दारुची पार्टी करायचे. काल ही दोघांनी पार्टीचा बेत आखला. मात्र नशेत असताना चारित्र्याच्या संशयावरून दोघांमध्ये भांडण झालं अन त्यावेळी पत्नीने नकुलचा गळा घोटला. पूर्ण नशेत असलेला नकुल तिला विरोध करण्यात अयशस्वी ठरला.

Pune Crime News: निवडणुकीत नगरसेविका बनवण्यासाठी प्रयत्न करत होता

काल (शुक्रवारी दि. २४) पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास चिंचवड येथील लिंक रोडवरील माणिक कॉलनीतील महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या इमारतीत ही धक्कादायक घटना घडली. नकुल आनंदा भोईर (वय ४०, रा. माणिक कॉलनी, चिंचवड) असे मृताचे नाव असून, पत्नी चैताली भोईर (२८) हिला पोलिसांनी ताब्यात घेतले. नकुल आपल्या बायकोला आगामी महापालिका निवडणुकीत नगरसेविका बनवण्यासाठी प्रयत्न करत होता. 

Continues below advertisement

Pune Crime News: मध्यरात्री अडीचच्या सुमारास वाद विकोपाला गेला

चिंचवडचे पोलिस निरीक्षक दीपक गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून पत्नी चैतालीच्या चारित्र्यावर संशय घेऊन नकुल तिच्यासोबत भांडत असत. त्यांच्या घरापासून शंभर मीटरवर त्यांच्याच जागेत आरोग्य विभागाची इमारत आहे. ती वापरात नसून तिची किल्ली नकुलकडे असते. गुरुवारी (दि. २३) रात्री साडेदहापासून दोघे तेथे गप्पा मारत बसले होते. त्यावेळी चारित्र्याच्या संशयावरून वाद सुरू झाला. मध्यरात्री अडीचच्या सुमारास वाद विकोपाला गेला. त्यातून चैतालीने लांब कापडाने नकुल यांचा गळा आवळला. त्यातच त्यांचा जीव गेला. तिनेच पोलिसांना फोन करून कळवले. पोलिसांनी धाव घेतली त्यावेळी चैताली मृतदेहाशेजारी बसून होती. तिला ताब्यात घेतलं आणि तपासाला सुरूवात केली.

Pune Crime News:  नकुल विविध सामाजिक चळवळींमध्ये अग्रेसर

नकुल भोईर मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि मराठा क्रांती मोर्चासारख्या संघटनांमध्ये सक्रिय होता. सर्पमित्र म्हणूनही त्यांची ओळख होती. विविध सामाजिक चळवळींमध्ये नेहमी अग्रेसर असल्याने, त्यांचा मोठा जनसंपर्क होता. दाम्पत्याला पाच आणि दोन वर्षांची दोन मुले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत पत्नी चैतालीला उभे करण्यासाठी नकुलने अनेक नेत्यांशी संपर्क साधला होता.