पुणे : पुण्यात न्यायाधीशाच्या पतीने चक्क वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे 8 तासांपेक्षा जास्त कालावधी उलटल्यानंतरही वाहतूक पोलिस रवींद्र इंगळेंना मारहाण करणाऱ्या श्याम भदाणेवर गुन्हा दाखल झालेला नाही.


पुण्यातील गजबजलेल्या कर्वे रोडवरील स्वातंत्र्य चौकात हा प्रकार घडला आहे. बुधवारी दुपारी बारा-साडेबारा वाजताच्या सुमारास डेक्कन परिसरात श्याम भदाणे नो एन्ट्रीतून दुचाकी घेऊन आले. यावेळी वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र इंगळे यांनी भदाणेंना अडवलं. दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली, आणि श्याम भदाणेनं रवींद्र इंगळेंना मारहाण केली.

मारहाण करणाऱ्यांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. तिथून जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात या घटनेचं रेकॉर्डिंग झालं आहे.

इतकं सगळं होऊनंही केवळ श्याम भदाणे यांच्यावर अद्यापही गुन्हा दाखल केलेला नाही. भदाणे यांची पत्नी न्यायाधीश असल्यानं त्यांना स्पेशल ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे आपल्या देशात कायदा सर्वांना समान आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पाहा व्हिडिओ :