पुणे: पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात बेकायदा हुक्का पार्लरवर काल संध्याकाळी पोलिसांनी छापा मारला आहे. याआधीही कोरेगाव पार्कमध्ये इतर हुक्का पार्लरवर कारवाई करण्यात आली होती.


 

हॉटेल डार्क हॉर्सवर कारवाई करताना बेकायदा हुक्क्याचं साहित्य पोलिसांनी जप्त केलं आहे. पुण्यातील हुक्का पार्लरचे फुटलेले पेव अद्याप थांबत नसल्याचं दिसून येत आहे.

 

पुण्यातील कोरगाव पार्क या उच्चभ्रू वस्तीत बेकायदेशीररित्या हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यावर छापा टाकून पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. याप्रकरणी हॉटेलच्या मॅनेजरसह 3 जणांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.