Guillain Barre Syndrome: पुण्यात नांदेड सिटी, सिंहगड रोड, धायरी परिसरात गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome ) या दुर्मिळ आजाराचा धोका वाढला असून दोन दिवसात पुण्यात गुलेन बेरी सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे . रुग्णांची संख्या 22 वरून थेट 59 वर गेली आहे .यात 12 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत . वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुणे महापालिका (PMC ) अलर्ट मोडवर आली आहे . दूषित पाणी पिल्याने हा आजार झाल्याची माहिती असून या परिसरातले पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत . हा आजार धोकादायक नसला तरी मृत्यूचा धोका 5% आहे .शिवाय व्हायरस आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन झाले असल्यास हा आजार होण्याचा धोकाही अधिक आहे . यावर नागरिकांनी घाबरून न जाता न्यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ पुणेचे प्रेसिडेंट डॉक्टर राहुल कुलकर्णी यांनी या आजाराचा धोका टाळण्यासाठी काही सूचना दिल्या आहेत .(Pune)
नांदेड सिटी आणि सिंहगड रोड परिसरात दूषित पाणी पिल्यामुळे या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढल्याचं समोर आलं आहे. पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून हा आजार धोकादायक नसला तरी मृत्यूचा धोका ५% आहे, शिवाय व्हायरस आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल असल्यास हा आजार होण्याचा धोका जास्त आहे. त्यामुळे पाणी उकळून पिणे आणि फ़ास्ट फ़ूड किवा उघड्यावरचं अन्न खाऊ नये, असा सल्ला न्यूरोलॉजिकल सोसायर्टी ऑफ पुणेचे प्रेजिडेंट डॉ. राहुल कुलकर्णी (Dr. Rahul Kulkarni) यांनी दिला आहे.
आजार रोखण्यासाठी काय करावे?
-पिण्यापूर्वी पाणी उकळून घ्या.
-पाण्याच्या सुरक्षिततेबाबत खात्री नसल्यास बाटलीबंद पाणी वापरा.
-भाज्या, फळे चांगले धुवा.
-पोल्ट्री आणि मांस योग्य प्रकारे शिजवा. (कच्चे किंवा कमी शिजलेले अन्न,
विशेषतः अंडी)
-सीफूड टाळा.
-जेवण्यापूर्वी व शौचालय वापरल्यानंतर साबणाने हात
धुवा.
-बाहेरील अस्वच्छ बाबी हाताळताना
काळजी घ्या.