Pune Ganesh Festival 2022: यंदा गणेश विसर्जन मिरवणुका (Pune ganeshotsav) दुसर्‍या दिवशीपर्यंत सुरु होत्या.  पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणुक तर सुरुच दुसऱ्या झाली. तर मुंबईतील लालबागच्या राजासह अनेक मंडळांच विसर्जन दुसर्‍ या दिवशी पार पडलं. उत्सवाच्या नावाखाली उन्मादाकडे वळलेल्या या अशा विसर्जन मिरवणुकांमुळे धर्मशास्त्राचाही भंग होत असल्याच धर्म अभ्यासकांच मत आहे.


पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणुक लक्ष्मी रस्त्यावरून दुसर्‍या दिवशी आठ वाजता सुरु झाली . तर मुंबईतील लालबागच्या राजासह इतर गणपतीचं विसर्जन होईपर्यंत सुर्य डोक्यावर आला होता. निर्बंधमुक्त गणेशोत्सवाच्या नावाखाली मोकळीक दिली गेल्याने अनेक गणेश मंडळं तासनतास रस्त्यावर ठाण मांडून होती.  ही मंडळं जोपर्यंत पुढं सरकत नव्हती तोपर्यंत इतर मंडळांना पुढे जाण्यास वाव नव्हता. त्यामुळे दगडूशेठ, मंडई, बाबू गेणू या मंडळांना विसर्जन मिरवणुकीत सहभागी होईपर्यंत दुसरा दिवस उजाडला होता.


गणेश विसर्जन हे अनंत चतुर्दशीच्या दिवशी धर्मशास्त्रानुसार व्हायला हवं. हिंदू धर्मशास्त्रानुसार दुसर्या दिवशीचा सुर्योदय होण्याआधी हे विसर्जन होणं अपेक्षित असतं.  मात्र गेली काही वर्षी जल्लोषाच्या नादात गणेश मंडळांकडून धर्मशास्त्र बाजूला सारून ठेवलं जातय. दुसर्‍ दिवशी केलेलं हे असं विसर्जन धर्मशास्त्रात बसत नसल्याच धर्मशास्त्राच्या अभ्यासकांच मत आहे. 


गेली अनेक वर्षं पुणे आणि मुंबईसह इतरही शहरातील विसर्जन मिरवणुक दुसर्‍या दिवशीपर्यंत लांबले. यावेळेस तर निर्बंधमुक्त गणेशोत्सवाची खुद्द मुख्यमंत्र्यांनीच घोषणा केली. मात्र काहींनी त्याचा अर्थ मनमानी करण्यास मोकळीक असा घेतला. विसर्जन मिरवणुकीला आलेल्या या स्वरुपाबाबत गणेश मंडळांचे कार्यकर्तेच चिंता व्यक्त करत आहेत. त्यामुळे उत्सव साजरा करणारी गणेश मंडळं आणि त्याच्या नियोजनाची जबाबदारी असलेल्या राजकीय नेत्यांनी याचा विचार करण्याची गरज आहे. 


गणेशाची आराधना हे व्रत आहे. लोकमान्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सामान्यांचा सहभाग वाढावा म्हणून या  व्रताला सार्वजनिक उत्सवाचे रुप दिले. त्यामधे ते यशस्वी ठरले. धर्मशास्त्रानुसार सकाळी सुरु झालेली मिरवणूक सुर्यास्ताच्या आत संपायला हवी. मात्र आत्ता  धर्मशास्त्राच्या नेमके उलटे केले जात आहे.  मिरवणुकीत वाजवले जाणारे संगीत आणि घातले जाणारे कपडे याबाबत धर्मशास्त्रात जे सांगितले आहे त्याचे पालन होत नाही, असं मत मोरेश्वर घैसास गुरुजी यांनी व्यक्त केलं आहे. 


130 वर्षांची परंपरा असलेल्या गणेशोत्सवाने अनेक बदल पाहिलेत.  मात्र सध्या दोन दोन दिवस चालणाऱ्या विसर्जन मिरवणुका ना धर्मशास्त्रात बसणाऱ्या आहेत ना गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाशी त्याचा काही संबंध आहे. सवंग लोकप्रियतेसाठी त्याला पाठिंबा देणाऱ्या राजकिय नेतृत्वाने लक्षात घ्यायला हवं आणि उत्सव आणि उन्माद यातील फरक समजून घ्यायला हवा, अशी अपेक्षा आहे.