Ajit Pawar : बारामतीत माझं काम बोलते. त्यामुळं तुम्ही बारामतीची काळजी करु नका. माझ्यापेक्षा जास्त काम करणारं कोण असेल तर बारामतीकर त्याचा विचार करतील, असे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं. पुण्यातील (Pune) विविध मानाच्या गणपती बाप्पाचे अजित पवार यांनी आज दर्शन घेतले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. उद्धव ठाकरेंचे आमचे सरकार असते तर हाच निर्बंधमुक्त उत्सव साजरे करण्याचा निर्णय झाला असता असेही अजित पवार यांनी व्यक्त केलं. त्या काळात कोरोनाचा धोका वाढला होता. म्हणून त्यावेळी माणसं जगवणं महत्त्वाचं होतं. म्हणून टास्क फोर्सने दिलेल्या नियमांचे पालन केलं जात होतं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील काही काळ देशात लॉकडाऊन केला होता. दुर्दैवानं महाराष्ट्रात आणि केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त होती. त्यामुळं निर्बंध आणले होते असेही अजित पवार म्हणाले.


बाप्पाकडे काही मागणं केलं नाही. भक्तीभावानं दर्शन घेतलं


पुण्यातील विविध मानाच्या गणपती बाप्पाचे अजित पवार यांनी आज दर्शन घेतले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना बाप्पाकडे काय मागणं केले असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी अजित पवार म्हणाले की, बाप्पाकडे काही मागणं केलं नाही. भक्तीभावानं बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. प्रत्येकवेळी बाप्पाकडं मागणं केलेचं पाहिजे असे नाही असेही अजित पवार म्हणाले. मनमोकळेपणानं दर्शनाला जावं, सारखेचं त्यांना साकडं घालून त्यांना अडचणीत कशाला आणायचे आहे, असेही अजित पवार म्हणाले.  


भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील


राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विविध पक्षाचे नेते देखील सहभागी होत आहेत. राष्ट्रवादी त्यामध्ये सहभागी होणार का? असा सवाल अजित पवार यांनी विचारण्यात आला. यावेळी त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या संदर्भातील काही प्रश्न असतील तर मी त्याची उत्तरे देऊ शकतो. हा निर्णय देशपातळीवरचा आहे. आज मी मिरवणूक झाल्या की, दोन दिवस दिल्लीला जात आहे. तिथे कार्यकारिणी आहे. त्याचा निर्णय दिल्लीत होईल, अजित पवार राष्ट्रीय पातळीवरचा नेता नाही असेही अजित पवार म्हणाले. 


बारामतीत माझं काम बोलतं


बारामतीत माझं काम बोलते. त्यामुळं तुम्ही बारामतीची काळजी करु नका. माझ्यापेक्षा जास्त काम करणारे कोण असेल तर बारामतीकर त्याचा विचार करतील असे अजित पवार म्हणाले. कावळ्याच्या शापानं कोणी मरत नसतं, ही वस्तूस्थिती आहे. नवीन अध्यक्ष झाल्यावर त्यांना हुरुप असतो. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बारामतीला आल्यामुळं तुम्ही प्रसिद्धी दिली असल्याचे अजित पवार म्हणाले. कोणीही बारामतीमध्ये यावं. सर्वांचे बारामतीकर स्वागत करतात. पण मतदानादिवशी कुठे मत द्यावं हे त्यांना खूप चांगल माहित असल्याचे अजित पावर यांनी सांगितले. 


महत्त्वाच्या बातम्या: