Pune Flood News : सिंहगड रस्ता परिसरात निळ्या पूररेषेत असलेल्या पूरग्रस्त घरांचे महापालिकेकडून सर्वेक्षण (Survey of flood affected houses) सुरु करण्यात आलं आहे. 24 जुलैला जवळपास 120 पेक्षा जास्त घरांमध्ये पाणी शिरले होतं. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालं आहे. नागरिकांचे पुनर्वसन किवा ही पूरस्थिती कायमची रोखण्यासाठी तत्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) महापालिका प्रशासनास दिल्या होत्या. त्यानुसार, पालिकेकडून या भागातील घरांचे आणि व्यावसायिक मिळकतींचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यासाठी, बांधकाम विभागाकडून पथके नेमण्यात आली आहेत. पुढील आठ ते दहा दिवसांत हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. 


पावसामुळं पुण्यात जनजीवन विस्कळीत झालं होतं


गेल्या महिन्यात पुण्यात मुसळधार पावसानं हाहाकार घातला होता. या पावसामुळं पुण्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अनेक भागातील घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं होतं. पुणे महानगर पालिका हद्दीत एकता नगरी सिंहगड रोड वरील द्वारका सोसायटी, शरदा सरोवर सोसायटी, शाम सुंदर सोसायटी, निंबजनगर परिसरातील सोसायटी, सिंहगड रोड, घरकुल सोसायटी पिंपरी चिंचवड, वृंदावन आश्रम आकुर्डी विशालनगर, जगताप डेअरी विणस सोसायटी, कुंदननगर या गृह निर्माण हाउसिंग सोसायटी मध्ये पावसाचे पाणी शिरले होते. यामुळं जनजीवन विस्कळीत झाले होते. पुण्यातील राजपूत झोपडपट्टी, पुलाची वाडी, पाटील इस्टेट, पर्वती, दत्तवाडी, सिंहगड रोडचा काही भाग, कात्रज, कर्वेनगर, नारायण पेठ, कसबा पेठ आणि बोपोडी या भागात नदीच्या जवळ असल्यामुळे वारंवार पूर येत आहे.  दरवर्षी पावसाळ्यात सरासरी 300 कुटुंबांना या भागातून स्थलांतरित केले जाते.


सिंहगड भागातील एकतानगर, वारजे, खिलारी वस्ती, फुलाची वाडी या भागातील घरांचं मोठं नुकसान


जुलै महिन्यात पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळं खडकावसला क्षेत्रातील चारही धरणं तुडुंब भरली होती. त्यानंतर 24 जुलैरोजी रात्रभर झालेल्या पावसामुळं 25 जुलैला खडकवासला धरणातून 35 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग मुठा नदीत सोडण्यात आला. त्यामुळं सिंहगड भागातील एकतानगर, वारजे, खिलारी वस्ती, फुलाची वाडी या भागातील घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं. या पुराची प्रशासनानं गांभीर्यानं दखल घेतली होती. घटनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील नेत्यांनी घटनास्थळी भेट दिली होती.


महत्वाच्या बातम्या:


पुराच्या पाण्यातून रस्ता ओलांडताय? अशी चूक चुकूनही नका करू; शेतकऱ्यांसह सामान्यांनी पूरपरिस्थितीत कशी काळजी घ्यावी?