पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाचा पेपर फुटला आहे. वेळापत्रकानुसार इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा पेपर शनिवारी आहे. मात्र तो पेपर काही दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर फॉरवर्ड होत आहे.
मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या इंजिनिअरिंग कॉलेज पुणे इथल्या विद्यार्थ्यांना परिक्षेआधीच पेपर मिळाल्याने सर्वत्र गोंधळ उडाला आहे.
दरम्यान, याप्रकरणी कुलगुरु डॉ. वासुदेव गाडे यांनी एका समिती नेमली असून, कॉलेजला गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.