पुणे: पुण्यातल्या मार्केटयार्डमध्ये आंबा महोत्सवात लागलेल्या भीषण आगीत आंब्यांचे स्टॉल्स जळून खाक झाले आहेत.


महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाकडून या आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं.

मात्र सकाळी 11 च्या दरम्यान या महोत्सवातील आंब्यांच्या स्टॉल्सना आग लागली. जवळपास 66 स्टॉल्स या महोत्सवात होते. मात्र या आगीमुळे ते संपूर्ण स्टॉल जळून भस्मसात झाले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. दोन- अडीच तासानंतर ही आग विझवण्यात आली. मात्र संपूर्ण परिसर अक्षरश: जळून खाक झाला आहे.

या आगीमुळे आंबा उत्पादक-व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.