पुणे : टीम टीम टिंबाली, माझ्या गणानं घुंगरु हरवलं यासारखी लोकप्रिय गीतं लिहिणाऱ्या उत्तम कांबळेंना शाहीर नंदेश उमप यांनी मदतीचा हात दिला आहे. उत्तम कांबळेंच्या पुण्यातील घरी जाऊन उमप यांनी आर्थिक मदत केली.
गीतकार उत्तम कांबळे यांना आयुष्याच्या उत्तरार्धात हलाखीचं जीवन जगावं लागत आहे. 'एबीपी माझा'नं उत्तम कांबळे यांची कैफियत मांडल्यानंतर शाहीर नंदेश उमप यांनी त्यांची भेट घेतली.
नंदेश उमप यांनी उत्तम कांबळेंच्या पुण्यातील घरी जाऊन त्यांना गृहोपयोगी वस्तू आणि आर्थिक मदत केली. नंदेश उमप यांचे वडील शाहीर विठ्ठल उमप आणि उत्तम कांबळे यांनी एकत्र काम केलं होतं. त्या आठवणींना नंदेश उमप यांनी उजाळा दिला.
टीम टीम टिंबाली, माझ्या गणानं घुंगरु हरवलं, बंधू येईल माहेरी न्यायला यासारखी गाणी उत्तम कांबळेंच्या लेखणीतून उतरली आहेत,
नंदेश उमप यांच्याप्रमाणे प्रत्येकानंच पुढे येऊन उत्तम कांबळेंसाठी मदतीचा हात पुढे केला पाहिजे, असं आवाहनही करण्यात आलं.