पुणे : मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत घराबाहेर थांबलेल्या मुलाला आणि त्याच्या मित्राला पित्याने बांबूने मारहाण केल्याचा प्रकार पुण्यात समोर आला आहे. या प्रकरणी आरोपी पित्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातल्या कॅम्प परिसरातील गीता सोसायटीत ही घटना घडली आहे. अल्पवयीन मुलाच्या फिर्यादीनंतर आरोपी पिता युसुफ मेमन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेमन फरार असल्याची माहिती आहे.
मेमन यांचा मुलगा, फिर्यादी आणि वाढदिवस असलेला मित्र मंगळवारी रात्री फिरायला बाहेर गेले होते. ते पहाटे साडेतीन वाजता घरी परत आले. त्यावेळी गेटच्या बाहेर उभ्या असलेल्या युसुफ मेमन यांनी तिघांनाही बांबूनं मारहाण केली. यात फिर्यादीच्या नाकाचं हाड मोडलं.