पुणे :  देशातील सर्वात   (Pune Crime News)  मोठं ड्रग्स रॅकेट  (Pune Drugs) पुणे पोलिसांनी उघड केलं आहे. आतापर्यंतच तब्बल 4000 कोटींचं ड्रग्ज (Mephedrone) पुण्यात जप्त करण्यात आलं आहे. त्यातच पुणे पोलिसांनी जप्त केलेल्या ड्रग्सच्या साठ्याचा आज पंचनामा होणार आहे. पुणे जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश स्वत: येऊन मुद्देमालाची पाहणी करणार आहे. तब्बल 900 हून अधिक किलो हे मेफेड्रोन ड्रग्स आहेत. एवढं ड्रग्स कोर्टात नेणं शक्य नसल्याने  न्यायाधीश स्वत: येऊन पाहणी करणार आहे. साधारण पहिल्यांदाच न्यायाधीश स्वत: येऊन पाहणी करणार आहे. या मुद्देमालासंदर्भातील काही कागदपत्र न्यायाधीशांकडून काटेकोरपणे तपासले जात आहे. पुणे पोलिसांच्या मुख्यालयात हा पंचनामा करण्यात येत आहे. 


साधारण कोणतंही प्रकरण असलं की  मुद्देमाल कोर्टात घेऊन जावा लागतो. त्यानंतर न्यायाधीशांकडून या मुद्देमालाची पाहणी करावी लागते. मात्र यावेळी पहिल्यांदाच पुणे पोलिसांनी उघड केलेल्या सर्वात मोठ्या ड्रग्स रॅकेटमध्ये जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचा पंचनामा करण्यासाठी थेट न्यायाधीश स्वत: पोहचले आहे. पुणे पोलिसांनी छापेमारी करुन साधारण 950 किलोहून अधिक मेफेड्रोनचा ड्रग्ससाठा जप्त केला आहे. हा एवढा मोठा जप्त केलेला साठा कोर्टात नेणं शक्य नसल्याने न्यायाधीश स्वत: पंचनामा करण्यासाठी पोहोचले आहेत. 


पुणे पोलिसांच्या मुख्यालयात हा पंचनामा करण्यात येत आहे. या ठिकाणी पोलीस अधिकारी आणि कोर्टाचे अधिकाऱ्यांनाच प्रवेश देण्यात आला आहे. बाकी संपूर्ण परिसरात पोलिसांना कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. इतर कोणालाही या परिसरात प्रवेश दिला जात नाही आहे. कुरकुंभच्या MIDC च्या कारखान्यातून जप्त करण्यात आलेला ड्रग्स साठा, सांगलीतून जप्त करण्यात आलेला ड्रग्स साठा याच ठिकाणी सील करण्यात आलेला आहे. त्यानंतर दिल्लीत जप्त करण्यात आलेला साठा आज पुण्यात आणणार आहे. त्यानंतर दिल्लीतील साठ्याचादेखील पंचनामा करण्यात येणार आहे. 


आतापर्यंतचं सगळ्यात मोठं ड्रग्स रॅकेट उघड


पुणे पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेट उघड केलं आहे. त्यात 4000 कोटींचं ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे. या ड्रग्स रॅकेटचा म्होरक्या सनी उर्फ संदीप धुनिया याचादेखील फोटो पुणे पोलिसांच्या हाती लागलेला आहे.  संदीप धुनिया याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस काढण्यात आली आहे. ड्रग्स प्रकरणात आता इंटरपोलची मदत घेतली जाणार आहे. 

 

इतर महत्वाची बातमी-