पुणे : गेल्या काही दिवसांपासून हुंडाबळी, मारहाण, सुनेला घराबाहेर काढण्याच्या आणि छळाच्या घटना मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत, अशातच अवघ्या दीड महिन्याच्या संसारानंतर (Pune Couple Divorce) पसंत नसल्याचं आणि हुंडा-मानपान केला नसल्याचं कारण देऊन नववधूला घराबाहेर काढणाऱ्या पतीसह-सासरच्या मंडळींनी एकरकमी 45 लाख रुपये पोटगी (Pune Couple Divorce) देण्याची तयारी न्यायालयात दर्शवली. त्यानंतर नववधूने सासरच्या मंडळींविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचे दावे मागे घेतले असल्याची घटना समोर आली आहे.(Pune Couple Divorce)
Pune Couple Divorce: समुपदेशनातून संपला वर्षभराचा वाद; दाम्पत्याचा घटस्फोट अर्ज मंजूर
वर्षभरापासून न्यायालयीन लढाई लढणाऱ्या एका दाम्पत्याचा परस्पर संमतीने घटस्फोट अर्ज न्यायालयाने मंजूर केला. पत्नीच्या वकिलांनी केलेल्या समुपदेशनातून या कौटुंबिक वादात तडजोडीचा मार्ग निघाला असून एकरकमी पोटगीच्या बदल्यात प्रकरणाला पूर्णविराम मिळाला आहे. या दाम्पत्याचा विवाह जानेवारी २०२२ मध्ये मोठ्या थाटामाटात झाला होता. नवरी सासरी गेल्यानंतर काही दिवसांतच घरात वादाचे वातावरण सुरू झाले. लग्नात हुंडा व मानपान झाले नाही, अशी कुरकुर सासरकडून सुरू होती. त्यातच पतीने, "मला तू पसंत नाहीस; घरच्यांच्या दबावाखाली मी हे लग्न केले," असे बोलत पत्नीला सतत टोमणे मारल्याचे समोर आले.
Pune Couple Divorce: वर्षभर चाललेल्या वादाला अखेर पूर्णविराम
पती-पत्नीतील भांडणे चिघळल्यानंतर नवरीला सासरच्या मंडळींनी घराबाहेर काढले, असा आरोप करून तिने पती, सासू, सासरा व नणंदेविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी चौकशी करून संबंधितांवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला व न्यायालयात आरोपपत्र सादर केले. मात्र, प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर पत्नीची बाजू लढविणाऱ्या ॲड. प्रियांका काटकर व ॲड. रेश्मा सोनार यांनी दोन्ही पक्षांचे समुपदेशन केले. या प्रक्रियेत पतीने ४५ लाख रुपये एकरकमी पोटगी देण्यास सहमती दर्शवली. पत्नीनेही सकारात्मक प्रतिसाद देत कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप मागे घेतला. त्यानंतर आरोपींना न्यायालयाने कायदेशीररीत्या मुक्तता दिली. वाद मिटल्यानंतर दोन्ही पक्षांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने घटस्फोटाला मंजुरी दिली. अशा प्रकारे वर्षभर चाललेल्या वादाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.