मुंबई: राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला (Maharashtra Heavy Rain) आहे, मुंबई, पुणे, सांगली, सोलापूरसह मराठवाड्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे, अशातच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढील दीन ते तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने शुक्रवार ते रविवारपर्यंत मुंबईसह ठाणे जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain Alert) इशारा दिला आहे. मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.आधीच निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे मराठवाड्यात प्रशासन अलर्ट मोडवरती आहे.(Heavy Rain Alert)
Heavy Rain Alert: मुंबईसह ठाणे भागात रविवारपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा
बंगालच्या उपसागरात गुरुवारी रात्री कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे, याचबरोबर चक्रीय स्थिती याचाच प्रभाव असल्याने पुढील तीन ते चार दिवस राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही भागात अतिवृतीचा इशारा देखील हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईसह ठाणे भागात रविवारपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
गेले काही दिवसांमध्ये मुंबईत पावसाने विश्रांती घेतलेली होती. अधूनमधून हलक्या सरी बरसल्यामुळे मुंबईच्या तापमानातही काहीशी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून उकाडा वाढल्याने मुंबईकरांना हा पाऊस दिलासा देणारा असेल, तर इतर भागातही पावसाचे प्रमाण तुलनेने अधिक राहणार असल्याने यामुळे शेतीचे आणखी नुकसान होणार आहे. आधीच पिकांचे नुकसान झालेले असताना पुन्हा पडणाऱ्या पावसामुळे या नुकसानात भर पडणार आहे, यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
Heavy Rain Alert: दादरच्या शिवाजी पार्क परिसरात तासभरापासून मुसळधार पावसाला सुरुवात
मुंबईत हवामान खात्याने वर्तवलेला पावसाचा अंदाज आता खरा ठरतोय. दादरच्या शिवाजी पार्क परिसरात गेल्या तासभरापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसाचा फटका नागरिकांना बसताना दिसत आहे. शिवाजी पार्कमध्ये दररोज व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांच्या या पावसामुळे अडथळा निर्माण झाला आहे. हवामान खात्याने वर्तवलेला इशारा आता प्रत्यक्षात खरा ठरताना दिसत आहे.
Heavy Rain Alert: रायगडसह, पुणे घाटमाथा परिसराला अतिवृष्टीचा इशारा
रायगड जिल्हा तसेच पुणे घाटमाथा परिसराला रविवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या भागात रविवारी सर्वाधिक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. येथे दिवसभर संततधार पाऊस कोसळणार असून काही भागात कमी वेळात अधिक पावसाची नोंद होईल.
Heavy Rain Alert: पावसाचा अंदाज कुठे?
मुसळधार ते अतिमुसळधार : मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी , सिंधुदुर्ग, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर, सातारा घाट परिसर, नांदेड, लातूर, धाराशिव
मेघगर्जनेसह: धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, अमरावती,भंडारा, बुलडाणा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, नागपुर, वर्धा, वाशिम, यवतमाळ
मुसळधार: पालघर, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली
Heavy Rain Alert: नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची माघार
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी शुक्रवारी आणखी काही भागातून माघार घेतली. संपूर्ण पश्चिम हिमालयीन प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या काही भागातून मोसमी वाऱ्यांनी माघार घेतली आहे.
Heavy Rain Alert: मराठवाड्याला पावसाने झोडपलं
गेल्या आठवड्यात मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पडलेल्या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे, कोसळधारांमुळे अनेकांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अनेक गावांचा संपर्क तुटाला, पाऊस कमी झाला असला तरी पावसाने झालेल्या नुकसानामुळे नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. १८ ते २४ सप्टेंबर या कालावधीत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस धाराशिवमध्ये झाला असून, आठवडाभरात तेथे ३७६ टक्के इतका पाऊस झाला आहे. धुळे वगळता इतर सर्व जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.