Pune Cyber Crime :  गृहमंत्रालयातून बोलतोय असं सांगत (pune) पुण्यातील महिलेची 80 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. तुमच्या मुलींचे (Cyber Crime) पंतप्रधान योजनेतून शालेय शिक्षणाचे खर्च केंद्र सरकारकडून करून देतो, असं सांगत महिलेची केली फसवणूक केली आहे. ही महिला पुण्यातील वडगाव शेरी परिसरात रहायला आहे.  गृहमंत्रालयाच्या महसूल खात्यात काम करतो असे सांगत मुंबईतील दांपत्याने फसवणूक केली आहे. या प्रकरणी महिलेने मुंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी या दांपत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


फिर्यादी आणि आरोपी असलेल्या मुंबईतील दाम्पत्याची ओळख काही दिवसांपूर्वी ऑनलाईन माध्यमातून झाली होती. फिर्यादी आणि आरोपी यांच्यामध्ये अनेक वेळा व्हिडीओ कॉल तसेच अनेक वेळा बोलणे देखील झाले होते. महिलेचा विश्वास संपादन करून आम्ही गृहमंत्रालयातील महसूल विभागात फाईल एडिटिंग डिपार्टमेंट ध्ये कार्यरत आहोत,असं सांगितलं होतं. 


मुंबईतील दाम्पत्याविरोधात मुंढवा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा


पंतप्रधान योजनेतून शालेय शिक्षणाचा खर्च सरकारकडून देतो, असं या दाम्पत्याने महिलेला भासवलं. त्यासाठी प्रत्येक मुलीचे 20000 असे दोन्ही मुलींचे मिळून 40 हजार रुपये या दाम्पत्याने आधी महिलेकडून उकळले. त्यानंतर या दाम्पत्याने महिलेकडून अनेक वेळा काही ना काही कारणे सांगत आणखी रक्कम पाठवायला सांगितली.  आत्तापर्यंत या दाम्पत्याने महिलेला 80 हजार रुपयांचा गंडा घातला. हा सगळा प्रकार फसवणुकीचा असल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी मुंबईतील दाम्पत्याविरोधात मुंढवा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.


आतापर्यंत अनेकांना गंडा


पुण्यात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. ऑनलाईन ओळख निर्माण होऊन अनेकांना आतापर्यंत गंडा घातला आहे. काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडमध्ये नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवत (Pune Crime) उच्चशिक्षित व्यक्तीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला होता. मल्टी नॅशनल कंपनीमध्ये वरिष्ठ पद मिळवून देतो, असे सांगत 58 वर्षीय व्यक्तीची तब्बल 7 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी 58 वर्षीय व्यक्ती यांनी पोलिसात फिर्याद दिली होती. ब्रोकस्टन विल्यम्स, ऑस्टिन इक्र, रिचर्ड अशा तीन जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे कोणत्याची अॅपवरुन पैशाची देवाणघेवाण करु नका आणि अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, असं आवाहन सायबर पोलिसांकडून वारंवार करण्यात आलं आहे. मात्र या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीत.