पुणे: मागील काही दिवसांपासून समोर येत असलेल्या महिला, अल्पवयीन मुलींशी संबधित अत्याचार आणि वियभंगाच्या घटनांनी राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. यादरम्यान जनजागृती, प्रशिक्षणे, समुपदेशन, मुलांना आणि मुलींना मार्गदर्शन केलं जात असल्याचं समोर येत आहे, असं असतानाच पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेत 19 अल्ववयीन विद्यार्थीनींचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. (Pune Crime News)


पुणे जिल्ह्यातील पौड मुळशी तालुक्यातील आंदगाव येथील एका शाळेमध्ये हा प्रकार घडला आहे. शाळेतील तब्बल 19 अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी शाळेतील उपशिक्षक जालिंदर नामदेव कांबळे (रा. लोणी काळभोर) याला पौड पोलिसांनी अटक केली आहे. शिक्षक दिनाच्या दिवशी हा प्रकार समोर आल्याने नागरिकांनी आणि पालकांनी संताप व्यक्त केला आहे. शाळा समितीचे अध्यक्ष राजेंद्र चंद्रकांत मारणे यांनी याबाबत फिर्याद दाखल केली होती. (Pune Crime News)


नेमकं काय आहे प्रकरण?


आंदगाव येथील शाळेत उपशिक्षक जालिंदर नामदेव कांबळे हा विद्यार्थिनींना मारहाण करतो, त्यांच्याशी अश्लील (Pune Crime News) भाषेमध्ये बोलतो. शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती शाळा व्यवस्थापनाला मिळाली त्यानंतर 5 सप्टेंबरला संस्थेच्या कार्यकारिणी समितीमधील सदस्य शाळेत चौकशीसाठी गेले. त्या वेळी शाळेतील 19 विद्यार्थिनींनी सदस्यांना जालिंदर नामदेव कांबळेच्या वर्तणुकीविषयी  लेखी अर्ज दिले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. 


शाळेकडून देण्यात आलेल्या तक्रारीनुसार, कांबळेने शाळेत खेळणाऱ्या मुलीच्या डोळ्यावर पट्टी बांधून तिला मिठी मारली (Pune Crime News), त्या वेळी इतर विद्यार्थी ओरडल्याने त्याने तिला सोडल्याचा प्रकार समोर आला आहे. कांबळे हा वर्गामध्ये विनाकारण विद्यार्थिनींच्या अत्यंत जवळ जाऊन कानामध्ये बोलायचा किंवा मग मोठ्याने कानात ओरडायचा. हाताला स्पर्श करून डोक्यावर डोके आपटत होता, त्याला विरोध केल्यानंतर तो मुलींना मारहाण देखील करायचा.


त्याचबरोबर शिक्षक कांबळे हा शिकवताना विनाकारण फळ्यावर मुका, किस, पप्पी असे शब्द मुद्दाम लिहायचा. शिकवताना मामाने
मामीला मळ्यात मिठी मारली, असं देखील म्हणायचा. शाळेतील विद्यार्थिनींनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. मिळालेल्या तक्रारीच्या आधारे जालिंदर कांबळेला पौड पोलिसांनी लोणी काळभोरमधून अटक (Pune Crime News)केली आहे. घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक योगेश जाधव हे करीत आहेत.


पुण्यात भररस्त्यावर छेडछाडीचा संतापजनक प्रकार! 


पुण्यात सराईत गुन्हेगाराने भर रस्त्यात एका आयटी अभियंता तरुणीची छेड काढून तिला मारहाण केल्याची घटना, स्वारगेट परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे, या प्रकारानंतर पुण्यात पोलिसांचा (Pune Police) धाक उरला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 


या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तर आरोपीला स्वारगेट पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. कृष्णा बाबूराव सावंत (वय 25, रा. वांजरखेडा, ता. निलंगा, जि. लातूर) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचं नाव आहे. या धक्कादायक प्रकाराबाबत 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली होती.