पुणे : एकीकडे पुणे पोलीसांनी पुण्यातील गुंडांची मंगळवारी (Pune Crime news) एकत्रित धिंड काढून त्यांना जरब बसवण्याचा प्रयत्न केला असताना रविवारी घडलेल्या गुन्ह्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये विश्रांतवाडी भागातील गुंडांकडून एका वाईन शॉपमधे गळ्यावर कोयता (koyta Gang) ठेवून बीअरच्या बाटल्या लुटण्यात आल्याचं समोर आलं आहे. उधार बियर न देणाऱ्या बियर शॉपीच्या मालकाच्या गळ्याला कोयता लावून टोळक्याने बियरच्या बाटल्या पळवल्याच या व्हिडीओमध्ये दिसत आहे. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातील धक्कादायक प्रकार आहे. स्वप्निल उर्फ सोप्या भालेकर आकाश प्रकाश शिंदे अशी बिअरच्या बाटल्या चोरणाऱ्या आरोपींची नावे आहेत.
आरोपी पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात राहायला असून याच भागात असणाऱ्या एका बियर शॉपीत दारू पिण्यासाठी हे दोघे गेले होते उधारीची मागणी या दोघांनी केल्यानंतर दारू विक्रेत्यांनी त्यास नकार दिल्यानंतर दोघांनी त्यांच्याजवळ असलेल्या कोणता बिअर मालकाला गळ्याला लावून बिअरच्या बाटल्या चोरून पळ काढला. या अशा गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी पुणे पोलीसांनी पुण्यातील नामचीन 267 गुंडांची धिंड काढली होती.
गुंडागिरी संपेना!
पुण्यातील असे प्रकार सातत्याने वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी चिकनशॉप चालकाने नागरिकांवर कोयत्याने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील नऱ्हे गावात हा प्रकार समोर आला होता. या चिकन शॉप परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. या हल्ल्यात पोलीस आणि नागरिक जखमी झाले होते. ही घटना नऱ्हे गावात घडली होती. वेळीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून मोठा अनर्थ टळला होता.
पुण्यात कोयता, कुऱ्हाड घेऊन दहशत माजवण्याचा पॅटर्न
गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील अनेक परिसरात रोज एक भाई आणि त्यांच्या टोळ्या तयार होताना दिसतायत. वय अवघे 18- 25 , अंगावर एखादा टी शर्ट टाकायचा, फाटलेली पँट घालायची, खिशात रुमाल, तोंडावर मास्क आणि हातात कोयता अशी ओळख या नवीन भाई लोकांची तयार झाली आहे. त्यामुळे पुण्यात नव्या भाईगिरीचा उदय झाला आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. पुण्यातली भाईगिरी काही नवीन नाही पण कोयता, कुऱ्हाड घेऊन दहशत माजवण्याचा पॅटर्न सध्या अनेक महिन्यांपासून शहरातील मध्यवर्ती भागात पाहायला मिळतोय.
इतर महत्वाची बातमी-