Pune Koyta Gang :  पुण्यात दहशत (Koyta gang) माजवणाऱ्यांना (Crime) स्थानिकांनीच चोप दिला आहे. पुण्यात कोयता गँग दहशत सुरू असताना सोमवारी (9 जानेवारी) रात्री 9 च्या सुमारास तुळशीबागेत बांबू घेऊन दहशत माजवणाऱ्या दोघांना स्थानिक दुकानदारांनी चांगलाच चोप दिला आहे. बांबू घेऊन खंडणी मागणी लुटणे, असे प्रकार असे प्रकार सर्रास सुरू असतात. त्यामुळे सोमवारी रात्री दोन जणांनी दहशत माजवण्यासाठी बांबू हाती घेत दहशत माजवायला सुरुवात केली. उपनगरामध्ये दहशत करणारे आता गर्दीच्या ठिकाण असलेल्या तुळशीबाग आणि तापकीर गल्लीत दहशत माजवत होते. मात्र स्थानिकांनी  पकडून चांगलाच चोप दिल्याचा सीसीटीव्ही आता व्हायरल होत आहे.  दहशत माजवणाऱ्या दोघांपैकी एक जण पळून गेला तर दुसऱ्याला पकडून फरासखाना पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून तपास सुरू आहे.ही दोन्ही मुलं अल्पवयीन असल्याचे प्राथमिक तपासात उघड झालं आहे.


मागील काही दिवसांपासून अनेक भागात ही टोळी दहशत पसरवत आहे. त्यांच्या या दहशतीमुळे शहरातील अनेक भागात भितीचं वातावरण निर्माण आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या गॅंगने कोयते फिरवत दहशत निर्माण केली आणि तापकीर गल्लीच्या उत्तर दिशेला पळत सुटले होते. त्यावेळी स्थानिकांनीच एकत्र येण्याच ठरवलं आणि स्थानिकांनीच या गॅंगला चोप दिला. 


कोयता गॅंग सक्रिय


मागील काही दिवसांपासून कोयता गॅंग शहरात दहशत निर्माण करता आहे. शहरातील विविध भागात या गॅंगने दहशत माजवली आहे. पुण्यात सर्रास कोयते उगारले जात आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात कोयता गॅंगची दहशत सर्रास सुरु आहे. शहरातील अनेक मध्यवर्ती तसेच उपनगरात तरुणांकडून भरदिवसा कोयते उगारले जात आहेत. या तरुणांमध्ये अनेक अल्पवयीन तरुण असून गेल्या अनेक दिवसांपासून पुणेकरांमध्ये भीती पसरली आहे. सामान्य नागरिक तसेच व्यापाऱ्यांना धमकावून खंडणी लुटण्याचे प्रयत्न देखील या तरुणांकडून केले जात आहेत. मात्र पुणे पोलिसांकडून कुठलीही कठोर कारवाई या तरुणांवर केली जात नसल्याचं चित्र प्रखरतेने जाणवत आहे. शहरात अनेक परिसरात कोयता गॅंगने दहशत निर्माण केली आहे.


पुणे पोलीसांचा अॅक्शन प्लॅन


पुणे शहरात सगळीकडे कोयता गॅंगने  धुमाकूळ घातला आहे. याच कोयता गॅंगवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत. पोलीस दलातील उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकार्‍यांची पोलीस आयुक्तालयात बैठक झाली. या बैठकीत हे आदेश देण्यात आले आहेत. कोयता गॅंगला रोखण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.