पुणे : तलवार घेऊन तरुणांकडून (Pune Crime News) दहशत माजवण्याचे (koyta Gang)  प्रकार पुण्यात सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे.पुण्यात तलवारीने गाडीची तोडफोड करण्यात आली आहे.  पुण्यातील गोखलेनगर परिसरात गुंडांनी दहशत माजवत गाड्यांची तोडफोड केली आहे. या संपूर्ण तोडफोडीता थरारक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत दोन तीन जण थेट गाड्यांची तोडफोड करताना दिसत आहे. त्यांच्या या दहशतीमुळे आणि तोडफोडीमुळे गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. 


या प्रकरणी तडीपार असलेला योगेश गायकवाड, मयुर मोरे व त्यांचा एक साथीदार यांच्यावर चतु:र्श्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोरे आणि गायकवाडला अटक करण्यात आली असून तिसरा आरोपी शोधण्याचे काम सुरू आहे. 


व्हिडीओत नेमकं काय आहे?
 


या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यात रात्रीच्यावेळी सामसूम ठिकणी उभ्या असलेल्या गाड्या थेट फोडताना दिसत आहे. त्यासोबतच व्हिडीओतील हालचाली बघितल्या तर चार ते पाच जण रस्त्यावर दारुच्या नशेत धिंगाणा घालत असल्याचा अंदाज आहे.  हे सगळे एकमेकांशी धरपकड करत पसार झाल्याचंदेखील या व्हिडीओत दिसून येत आहे.हा व्हिडीओ घटनास्थळी राहणाऱ्या एका नागरिकाने आपल्या घरातील खिडकीतून काढला आहे.


कोयता गँगच्या दहशत 


काही दिवसांपासून कोयता गँगच्या दहशतीत वाढत होताना दिसत आहे. अनेकांच्या मुसक्या आवळून देखील कोयता गँगचा हैदोस संपताना दिसत नाही आहे. पुण्यात मुळशी पॅटर्न (Mulshi Pattern) चित्रपटाचा थरार पुन्हा पाहायला मिळाला. पुण्यात पाळलाग करत कोयत्याने हल्ला करत तरुणाचा खून करण्यात आला होता. शहरामध्ये गुन्हेगारी कमी होताना दिसत नाही  ज्यांचा खून होतोय ते देखील आणि जे खून करताय ते देखील अगदी कमी वयाचे युवक असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पुण्यात कोयत्याने हल्ला करत तरुणाचा खून करण्यात आला होता.  पाठलाग करून कोयत्याने हल्ला करून  खून केला होता. पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा  प्रकार घडला होता.  पाठलाग करत तरूणाला इमारतीच्या छतावर गाठले आणि कोयत्याने वार करत तरुणाचा खून करण्यात आला होता.


इतर महत्वाची बातमी-


Revanth Reddy : वरिष्ठ नेत्यांचा विरोध, पण पठ्ठ्याने बाजी मारलीच, रेवंत रेड्डी तेलंगणाचे मुख्यमंत्री, 7 डिसेंबरला होणार भव्य शपथविधी