पुणे: गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यातील गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं (Pune Crime News) चित्र दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणावर खुनाच्या घटना समोर येत आहेत. अशातच काल (मंगळवारी, ता ४) वाहतुकीने कायम गजबजलेल्या आणि वर्दळ असलेल्या शहरातील बाजीराव रस्त्यावर एका अल्पवयीन मुलाचा भरदिवसा डोक्यात आणि तोंडावर वार (Pune Crime News) करून खून करण्यात आला. ही घटना दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडली. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, तिघेही अल्पवयीन आहेत. घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. गेल्या तीन दिवसांत शहरात भरदिवसा झालेला हा दुसरा खून आहे. काही दिवसांपूर्वीच गणेश काळे नावाच्या रिक्षाचालकाचा खून झाला होता.(Pune Crime News) 

Continues below advertisement

Pune Crime News : मास्क लावून तोंड झाकलेले तीन आरोपी एकाच दुचाकीवरून आले

मयंक सोमदत्त खराडे (वय १७, रा. साने गुरुजीनगर, आंबिल ओढा) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयंक आणि त्याचा मित्र अभिजित संतोष इंगळे (वय १८, रा. दांडेकर पूल) बाजीराव रस्त्यावरील टेलिफोन भवन येथून दुचाकीने महाराणा प्रताप उद्यानाकडे येत होते. त्या वेळी मास्क लावून तोंड झाकलेले तीन आरोपी एकाच दुचाकीवरून आले. त्यांनी मयंक खराडे याच्या डोक्यात व तोंडावर शस्त्राने सपासप वार केले. भांडणात मध्यस्थी करणारा मयंकचा मित्र अभिजित याच्यावरही आरोपींनी कोयत्याने वार केले. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.

Pune Crime News : सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तातडीने तपास सुरू

हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मयंकला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, त्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली असल्याचेही चव्हाण यांनी माहिती देताना सांगितले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तातडीने तपास सुरू केला. भर दुपारी शहराच्या मध्यवस्तीतील गजबजलेल्या रस्त्यावर ही घटना घडल्याने परिसरात काही प्रमाणात दहशत निर्माण झाली. 

Continues below advertisement

दरम्यान पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे तपास सुरू आहे अशी माहिती देखील खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शशिकांत चव्हाण यांनी दिली आहे. 

Pune Crime News : कोयत्याने केस छाटले, बोटही कापले

बाजीराव रोड खून प्रकरण पूर्व वैमान्यासातूनच घडल्याचं समोर आलं आहे. या  खून प्रकरणातील आरोपींची नाव निष्पन्न झाली आहेत. पुण्यातील नव्याने उदयास येणाऱ्या माया टोळीचे हे कृत्य असल्याचं बोललं जात आहे. अभिजीत पाटील उर्फ माया, अमन उस्मान शिवलकर आणि अक्षय मारुती पाटोळे अशी या आरोपींची नावे आहेत. धारदार शस्त्रांचा वापर करत या तिघांनी मयंक खराडेचा खून केल्याची माहिती मिळाली आहे. आरोपींनी मयंक खराडेचे कोयत्याने केस छाटले होते. तसेच बोटही कापले होते. कापलेल बोट रात्यावर पडल्याचं पाहायला मिळालं. 

हेही वाचा

सकाळपासून पाळत अन् दुपारी वाजवला गेम, सहा महिन्यापूर्वी गणेश काळेला संपवण्याचा प्रयत्न फेल, पोलीस तपासात मोठी माहिती समोर पुणे हादरलं, शहराच्या मध्यवर्ती भागात दिवसाढवळ्या 17 वर्षीय युवकाचा खून; 3 दिवसात दुसरी घटना