Pune Crime News : गेल्या काही दिवसापासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे. आजही पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. भरदिवसा तीन जणांनी मिळून एका तरुणाचा खून केल्याची घटना घडली आहे. मयंक खराडे (17 वर्ष) असं हत्या झालेल्या तरुणाच नाव आहे. ही घटना पुण्यातील बाजीराव रोडवर घडली होती. दरम्यान, या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेले तीनही आरोपी हे विधी संघर्षग्रस्त बालक असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वीच्या भांडणातून हा प्रकार घडल्याची माहिती आहे.
आरोपी निष्पन्न करुन कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पूर्वीच्या भांडणातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गुन्हेगांविरोधात विरोधात मोहीम सुरू झाली आहे. अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या गुन्हेगारीबद्दल एक मोठं आव्हान असल्याचे पोलीस अधिकारी म्हणाले. कायदेशीररित्या जे अधिकार आहेत त्यानुसार कारवाई होत असल्याचे पोलीस म्हणाले.
पुण्यात नव्याने उदयास येणाऱ्या माया टोळीचे हे कृत्य
बाजीराव रोड खून प्रकरण पूर्व वैमान्यासातूनच घडल्याचं समोर आलं आहे. या खून प्रकरणातील आरोपींची नाव निष्पन्न झाली आहेत. पुण्यातील नव्याने उदयास येणाऱ्या माया टोळीचे हे कृत्य असल्याचं बोललं जात आहे. अभिजीत पाटील उर्फ माया, अमन उस्मान शिवलकर आणि अक्षय मारुती पाटोळे अशी या आरोपींची नावे आहेत. धारदार शस्त्रांचा वापर करत या तिघांनी मयंक खराडेचा खून केल्याची माहिती मिळाली आहे. आरोपींनी मयंक खराडेचे कोयत्याने केस छाटले होते. तसेच बोटही कापले होते. कापलेल बोट रात्यावर पडल्याचं पाहायला मिळालं.
मास्क घालून तीन तरुण आले आणि...
मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी 3 वाजून 15 मिनीटांच्या सुमारास ही घटना घडली आहे. अभिजीत इंगळे व त्याचा मित्र मयंक खरारे हे दुचाकीवरु जात असताना महाराणा प्रताप उद्यानाच्या जवळ दखनी मिसळच्या समोर अचानक जनता वसाहत मधील तीन तरुणांनी ज्यांनी मास्क लावला होता हे पाठीमागून आले. या तरुणांनी मयंक खराडे याच्या डोक्यात व तोंडावर शस्त्राने वार केले. त्यामध्ये मयंक खराडे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.
गेल्या 3 दिवसात झालेला हा दुसरा खून आहे. त्यामुळे, शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. गेल्या काही महिन्यात अशा घटनांत वाढ झाल्याचं दिसून येत आहे. दोनच दिवसांपूर्वी पुण्यात गणेश काळे हत्याप्रकरणाने खळबळ उडाली होती. त्यानंतर, आता 17 वर्षीय मयंक खराडे या युवकाचा खून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पुण्यातील मध्यवर्ती भाग असलेल्या बाजीराव रोडवर खुनााची घटना घडली आहे. धारदार शस्त्र वापरत आरोपीने खून केल्याची माहिती आहे. या खुनाच्या घटनेचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
महत्वाच्या बातम्या: