पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळच्या (Sharad Mohol) पत्नीला धमकी  (Pune Crime news) देणारा आणि ससून रुग्णालयातून  (Sasoon Hospital)पळून गेलेला आरोपी मार्शल लुईस लीलाकरला पुणे पोलिसांनी मध्यरात्री बेड्या ठोकल्या आहेत. रात्री अडीचच्या सुमारास पोलिसांकडून  अटक करण्यात आली आहे. कुख्यात शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांना त्याने सोशल मिडीयावरून शिवीगाळ केली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. मात्र पोटात दुखत असल्याचा बहाणा केला. उपचारासाठी त्याला ससून रुग्णालयात घेऊन आले होते. त्यानंतर लीलाकरने तिथून 11 फेब्रुवारीला पळ काढला होता. 


फिर-फिर फिरला अन् मावशीच्या घरी आला...


ससूनमधून पळ काढल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी पथकं रवाना केली होती. त्यावेळी पुणे पोलिसांना लीलाकर हा नेरुळ, कर्जतकडे जात असल्याची माहिती मिळाली. लीलाकरचा फोटो सगळ्या टीम्सला फॉरवर्ड करण्यात आला होता शिवाय या दरम्यानच्या सगळ्या पोलीस ठाण्यातील पोलिसांना देखील फॉरवर्ड करण्यात आला होता. त्यानुसार  पोलीस पथक दोन -तीन दिवस त्याच्या मागावर होतं. जशी माहिती मिळत होती. तशापद्धतीने पोलीस त्याचा शोध घेत होते. सगळ्या रेल्वे स्टेशनवरचे सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले असता तो पुण्यात परत येत असल्याचं समजलं. पोलीस पथकाची त्याच्यावर 24 तास नजर होती. अखेर तो पुण्यात परत आला आणि पुण्यातील येरवडा परिसरात राहत असणाऱ्या त्याच्या मावशीच्या घरी गेला. ही माहिती पोलिसांना मध्यरात्री मिळाली. त्याचवेळी पोलिसांनी त्यांच्या मावशीच्या घरीच त्याला बेड्या ठोकल्या. 


 पोटदुखीचा बहाणा करुन पळाला पण....


काही दिवसांपूर्वी कुख्यात गुंड शरद मोहोळची पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पत्नी स्वाती मोहोळला जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. या प्रकरणी स्वाती मोहोळने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार लीलाकर याला अटक केली होती.  त्याने पोटात दुखत असल्याचा बहाणा केला आणि उपचारासाठी ससून रुग्णालयात आला होता. रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढला होता. 


पुणे पोलिसांसमोर लीलाकरला शोधण्याचं मोठं आव्हान


लीलाकर पळून गेल्यावर पुणे पोलिसांच्या कारभारावर मोठं प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. त्यानंतर पुणे पोलिसांसमोर लीलाकरला शोधण्याचं मोठं आव्हान होतं. मात्र पुणे पोलिसांच्या पथकाने अखेर रात्री अडीच वाजता त्याच्या मावशीच्या घरी त्याला गाठलं आणि बेड्या ठोकल्या.


इतर महत्वाची बातमी-


Shivajirao Adhalrao Patil : मी शिरूर लोकसभा लढणारचं! पुणे म्हाडाचे अध्यक्षपद मिळाल्यावर शिवाजी आढळरावांची डरकाळी, पण कोणत्या चिन्हावर की अपक्ष?