Baba Venga: बाबा वंगा (Baba Vanga Predictions) हे नाव कोणाला माहित नाही, असं कदाचितच कोणी असेल. बाबा वंगा आणि त्यांच्या भविष्यवाण्यांच्या चर्चा संपूर्ण जगभरात होत असतात. बल्गेरियातील बाबा वंगा  (Baba Vanga) यांनी केलेली भविष्यवाणी  दरवर्षी सोशल मीडियावर व्हायरल होत असते. 'बाल्कनच्या नॉस्ट्राडेमस' अशी त्यांची ओळख आहे. वयाच्या 12 व्या वर्षी बाबा वंगा यांची दृष्टी गेलेली. पण तरिही त्यांनी केलेली भविष्यवाणी जगाची दिशा ठरवते असा समज आहे. बाबा वंगा यांनी काही वर्षांपूर्वी अमेरिकेवर 9/11 चा दहशतवादी हल्ला आणि ब्रिटनमधील ब्रेग्झिटची भविष्यवाणी केली होती. त्यांच्यामार्फत करण्यात आलेली 2024 ची भविष्यवाणीमार्फत जगासमोर आली आहे. 2024 वर्षासाठी बाबा वंगाच्या भविष्यवाणीतून करण्यात आलेलं भाकीत, अत्यंत भयावह आहे. 


बाबा वंगा अंध होते, त्यांना 'बाल्कनचा नॉस्ट्राडेमस' असंही म्हणतात. बाबा वंगांनी केलेली 85 टक्के भाकितं अनेकदा बरोबर झाल्याचं पाहायला मिळालं आहे. असं म्हणतात की, बाबा वंगा लहान असताना वादळामुळे त्यांची दृष्टी गेली. पण त्यानंतर लवकरच त्यांना दैवी शक्ती प्राप्त झाल्याचं बोलंल जातं. बाबा वंगा बल्गेरियाच्या रहिवाशी. 1996 मध्ये 84 व्या वर्षी बाबा वंगांचा मृत्यू झाला होता. अशातच जाणून घेऊयात, बाबा वंगा यांची 2024 वर्षासाठी केलेली भविष्यवाणी... 


पुतिनची हत्या 


रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी एक वाईट बातमी. बाबा वंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, नव्या वर्षात पुतिन यांची हत्या केली जाऊ शकते. रशियातीलच कोणीतरी त्यांची हत्या करेल, असा अंदाज बाबा वंगा यांनी व्यक्त केला आहे. क्रेमलिन यांच्या वतीनं सातत्यानं पुतीन यांना कॅन्सर झाल्याचं वृत्त फेटाळून लावलं जात आहे. तसेच, पुतिन यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. 


युरोपात दहशतवादी हल्ले 


बाबा वंगा यांनी आपल्या भविष्यवाणीत जगात दहशतवाद फोफावणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच, युरोपला दहशतवादाचा मोठा फटका बसणार असल्याचंही सांगितलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, पुढच्या वर्षी एक मोठा देश जैविक शस्त्रांची चाचणी घेईल किंवा जैविक शस्त्रांचा वापर करुन हल्ला करेल. तसेच, दहशतवादी युरोपवर निशाणा साधणार असून युरोपातील विविध शहरांमध्ये ते हल्ले करतील, असा दावाही बाबा वंगा यांनी आपल्या भविष्यवाणीत व्यक्त केला आहे. 


जगाला आर्थिक संकटाचा धोका 


बाबा वंगा यांनी आणखी एक मोठी भविष्यवाणी केली आहे. जगाची अर्थव्यवस्था कोलमडू शकते, असा मोठा दावा बाबा वंगा यांनी आपल्या भविष्यवाणीतून केला आहे. कर्जाची पातळी, भू-राजकीय तणाव आणि आर्थिक शक्तींचं पश्चिमेकडून पूर्वेकडे स्थलांतर ही अशी कारणं आहेत, ज्यामुळे अर्थव्यवस्था कोलमडू शकते, असं बाबा वंगा यांचं म्हणणं आहे. 


पृथ्वीवरील वातावरण बदल 


बाबा वंगा यांनी पुढल्या वर्षी नैसर्गिक आपत्ती आणि खराब हवामानाचे विपरीत परिणाम पाहायला मिळतील असं भाकीत केलं आहे. वंगाच्या मते, पृथ्वीच्या कक्षेत बदल होणार आहे. हे फार कमी कालावधीसाठी होईल, परंतु त्यामुळे हवामान बदलाचे भयानक परिणाम दिसून येतील. तसेच, रेडिएशनचाही धोका पृथ्वीला असेल.


सायबर अटॅक 


बाबा वंगा यांनी आपल्या भविष्यवाणीतून जगाला सायबर हल्ल्याचा धोका असल्याचं म्हटलं आहे. अडव्हान्स हॅकर्स पॉवर ग्रीड्स आणि वॉटर ट्रीटमेंट प्लांट्ससारख्या गंभीर पायाभूत सुविधांना लक्ष्य करतील, असं बाबा वंगा यांनी म्हटलं आहे. यामुळे राष्ट्रीय स्तरावर सुरक्षेला धोका निर्माण होईल, असा अंदाज बाबा वंगा यांनी व्यक्त केला आहे.


कॅन्सरवर औषध


बाबा वंगा यांच्यानुसार वैद्यकीय क्षेत्रातून चांगली बातमी येऊ शकते. अल्झायमरसह कॅन्सरसारख्या आजारांवर नवे उपचार उपलब्ध होणार आहेत. 2024 मध्ये कॅन्सरवर उपचार करणं शक्य होईल, असा अंदाजही बाबा वंगा यांनी व्यक्त केला आहे.


तंत्रज्ञानात क्रांती 


पुढील वर्षी क्वांटम कंप्युटिंगमध्ये मोठा शोध लागेल असा अंदाज बाबा वंगा यांनी वर्तवला आहे. क्वांटम कंप्युटिंग वेगानं विकसित होत आहे. याद्वारे सामान्य कंप्युटर वापरण्यापेक्षा जलदगतीनं समस्या सोडवता येऊ शकतात, असं वंगा यांनी सांगितलं आहे, असं झाल्यास पुढील वर्षी AI चा वापर वाढेल.