पुणे : पुण्यातून एक ह्रदयद्रावक बातमी समोर आली आहे. क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने पुण्यातील चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील लोहगाव भागातून धक्कादायक घटना समोर आली आहे. शौर्य ऊर्फ शंभू कालिदास खांदवे असे मृत्यू झालेल्या 11 वर्षीय मुलाचे नाव आहे. त्याच्या अचानक मृत्यूमुळे खांदवे कुटुंबियांमध्ये शोककळा पसली


मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्दैवी घटना गुरुवारी पुण्यातील लोहगाव भागात घडली शंभू हा शाळेला उन्हाळी सुट्या असल्यामुळे गुरुवारी संध्याकाळी त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. शंभूला खेळताना अचानक समोरून येणारा चेंडू गुप्तांगावर लागला आणि तो मैदानावर कोसळला. काही वेळानंतर तो उठून उभा राहिला मात्र वेदना असह्य झाल्यामुळे तो परत मैदानावर पडला. तो खाली पडताच त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला.  तिथे असलेल्या नागरिकांनी शंभूला खाजगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर शंभूला मृत घोषित आले. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलीय.