पुणे : इंदापूर येथील गोळीबार प्रकरणातील आरोपीला इंदापूर पोलिसांनी दोन तासात वालचंदनगर येथून ताब्यात घेतलं आहे.गोळीबाराच्या घटनेनंतर इंदापूर तालुक्यासह आजूबाजूच्या तालुक्यात आणि जिल्ह्यात जागोजागी नाकाबंदी करण्यात आली होती. पोलिसांनी वालचंदनगर येथून या आरोपीला ताब्यात घेतले आहे. धीरज ऊर्फ सोन्या चोरमले असं त्याचं नाव असून तो शिरसोडी मधील आहे.  जुन्या भांडणाच्या कारणातून हा गोळीबार करण्यात आला होता, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.  नाकाबंदीमध्ये पोलीस अधिकारी राजकुमार डिंगे यांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.


पोलिसांनी आरोपीकडून एक पिस्तूल ही ताब्यात घेतलयं. इंदापूर शहरातील आय काॅलेजसमोर सायंकाळी सातच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली होती. यात राहुल अशोक चव्हाण हा जखमी झाला आहे. बारामती मधील महाविद्यालयाच्या आवारात झालेलं खून प्रकरण ताजं असताना घटना ताजी असताना पुण्याच्या इंदापुरामध्ये तरुणावर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली होती. या नंतर पोलिसांनी दौंड, यवत, वालचंदनगर, सोलापूर ग्रामीण शहर, धाराशिव भागात नाकाबंदी केली होती. इंदापूर पोलिसांनी या घटनेसंदर्भात बोलताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सप्टेंबर महिन्यात 12 शस्त्र जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  


गोळीबारानं एकच खळबळ


बारामती मधील घटना ताजी असतानाच इंदापूरमध्ये एका तरुणावर गोळीबार झाल्याचं समोर आलं होतं. या गोळीबाराच्या घटनेनं इंदापूरमध्ये खळबळ उडाली होती. पोलीस तपासात ज्याच्यावर गोळीबार झाला त्याचं नाव राहुल चव्हाण असल्याचं उघड झालं होतं.  


या घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमीला तातडीने खाजगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल  केलं. एक जण दुचाकीवरून आला आणि त्यानं तीन ते चार राऊंड फायर केले त्यापैकी तीन राऊंड राहुल चव्हाण याला लागले आणि तो जखमी झाला. 


बारामतीमधील खून प्रकरणानं खळबळ 


बारामतीमधील तुळजाराम चतुररचंद महाविद्यालयात भरदिवसा एका विद्यार्थ्याचा खून करण्यात आला होता. या खून प्रकरणामागील कारण समोर आलं आहे. गाडीवर कट मारल्याच्या रागातून बारावीमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा खून करण्यात आला.  पोलिसांनी या प्रकरणात एकाला अटक केली आहे तर, एक जण फरार आहे. 


इतर बातम्या :


Indapur : इंदापुरात गोळीबार, भर रस्त्यावर तीन राऊंड फायर, एकजण गंभीर जखमी; कायद्याची 'ऐसी की तैसी' सुरूच


VIDEO : लक्ष्मण हाके-मराठा आंदोलक पुण्यातील रस्त्यावर भिडले; हाकेंनी दारू प्यायल्याचा आंदोलकांचा दावा, मेडिकल टेस्ट करण्याचीही मागणी