पुणे: राज्यात अनेक ठिकाणी चोरीच्या घटना समोर येत आहेत. अशातच पुणे शहर परिसरात देखील चोरीच्या (Crime News) घटना समोर येत आहेत. एक कोथरूडमध्ये तर दुसरी घटना कर्वेनगरनध्ये घडली आहे. मॉर्निंग वॉकसाठी जात असलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरल्याची (Crime News) घटना समोर आली आहे. तर दुसरी घटना पुण्यात थेट सोसायटीमध्ये जाऊन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली आहे.(Crime News)
मॉर्निंग वॉकसाठी जात असलेल्या महिलांनो सावधान
पुण्यात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेचे मंगळसूत्र चोरट्याने हिसकावल्याची (Crime News) घटनी घडली आहे. पुण्यातील कर्वेनगरमध्ये घडलेल्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. पहाटेच्या वेळेचा फायदा घेत पाळत ठेऊन दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने मंगळसूत्र हिसकावले आहे. वृध्द महिला असल्यामुळे त्यांना पाठलाग करणे शक्य नव्हते. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज (बुधवारी ता-22) सकाळी 6.42 वाजता ही घटना घडली आहे. नवसह्याद्री सोसायटीतील चंदन पथ येथे सकाळी फिरायला जाणार्या जेष्ठ महिलांचे खुलेआम मंगळसूत्र चोरून (Crime News) हिसकावून नेले. हिसकवताना अर्धा भाग तुटून खाली पडला. चोरटा परत मागे आला व पडलेला भाग उचलून नेला. ना कोणाचे भय ना कोणती सुरक्षा अशी चिंता या ठिकाणी व्यक्त होते आहे.
सोसायटीमध्ये चोरट्यांनी हिसकावली सोनसाखळी
तर दुसरीकडे कोथरूड परिसरात थेट सोसायटीमध्ये जात चोरट्यांनी महिलेची सोनसाखळी हिसकावल्याची घटना घडली आहे. पुण्यातील कर्वेनगर पाठोपाठ आता कोथरूड भागात सुद्धा चोरीची घटना समोर आली आहे. दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेची सोनसाखळी हिसकावली आहे. पुण्यातील ही आणखी एक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. थेट सोसायटीच्या पार्किंगमध्ये जात चोरट्यांनी ही चोरी केली आहे. त्यामुळे आता पोलिसांचे भय राहिले आहे की नाही असा सवाल उपस्थित झाला आहे.(Crime News)
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोथरूड भागातील डी.पी रस्त्यावर असलेल्या नचिकेत सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. एक दाम्पत्य सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास शतपावली करून घरी परतत होते. त्यांनी सोसायटीमध्ये प्रवेश केला आणि घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकवली. पतीने त्यांना पकडायचा प्रयत्न केला, मात्र दुचाकीवर असल्यामुळे चोरट्यांनी तिथून पळ काढला. याबाबत पोलिसात त्यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.(Crime News)