Pune Crime News Update : उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या पुण्यातील विमानतळ परिसरातून हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस आले. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी टाकलेल्या धाडीत एका राजस्थानी हिरोइनसह दोन रशियन तरुणींना ताब्यात घेण्यात आलेय. विमानतळ आणि कोरेगाव पार्क परिसरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या हॉटेलमध्ये हा गोरखधंदा सुरू होता. बुधवारी रात्री सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली.


यातील टॉपची मॉडेल असलेली तरुणी ही राजस्थानातील अपकमिंग अभिनेत्री आहे.  हायप्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत धाड टाकली होती... एका पोलीस कर्मचाऱ्याला बनावट ग्राहक बनून पाठवण्यात आलं होतं. विशेष म्हणजे या सेक्स रॅकेटची सर्व सूत्र ही परदेशातून चालायची.. ऑनलाइन बुकिंग व्हायची.. पैसेही ऑनलाईन पाठवले जायचे.. एकदा खात्यात पैसे आले की एक थ्री स्टार हॉटेल बुक करून या तरुणीला तिथे पाठवली जायची. संबंधित ग्राहकालाही त्या हॉटेलचा पत्ता दिला जायचा.. आणि मग पुढचा व्यवहार पूर्ण व्हायचा.. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने हा सर्व प्रकार उघडकीस आणला..


पुण्यात याआधीही रॅकेट उघडकीस


पुण्यात अशा प्रकारे हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.. यापूर्वीही चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या काही तरुणींना वेश्या व्यवसाय करताना रंगेहात पकडण्यात आलं होतं. वेश्या व्यवसायात दररोज लाख रुपयांची लढाई होते. त्यात मॉडेल महिला असली की लाखो रुपये देण्यासाठी ग्राहक तयार असतात.. त्यामुळेच पुण्यासारख्या शहरातील काही महिने वेश्या व्यवसाय करायचा आणि पुन्हा आपापल्या राज्यात निघून जायचं असे प्रकार घडत असतात.. त्या निमित्ताने ते पुन्हा एकदा उघडकीस आले. 


दरम्यान मागील काही महिन्यांपासून ही अभिनेत्री आणि दोन तरुणी पुण्यातच वास्तव्यास होत्या. ठराविक महिन्याने वेगवेगळ्या शहर बदलायच्या.. आणि त्या त्या शहरात जाऊन वेश्या व्यवसाय करायच्या. झटपट पैसे मिळवण्याचा उद्देश आणि ऐशोआरामात राहणीमान यामुळे या तरुणी वेश्या व्यवसायाकडे वळल्या होत्या.. आणि विशेष म्हणजे त्यांना ऑपरेट करणारे दलाल कधी विदेशात तर कधी वेगवेगळ्या शहरात बसायचे.. पोलिसांनी या प्रकरणी तीन दलालांवर देखील गुन्हा दाखल केला आहे.. आणि त्या दलालाचा शोध आता सुरू आहे. 


नागरिकांना  थेट तक्रारी कराव्यात, पोलिसांचे आवाहन


पोलिसांनी सेक्स रॅकेट चालवणाऱ्यांविरोधात कारवाई केली आहे. अनेक हायप्रोफाइल प्रकरणे उघडकीस आणली होती. मसाज पार्लर स्पाच्या नावाने चालणाऱ्या व्यवसायांवर करडी नजर ठेवली जाणार असून नागरिकांना असं काही आढळल्यास थेट तक्रारी कराव्यात, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.