Pune Crime News : स्पीकरचा आवाज कमी करण्यास सांगितल्यावरून जेष्ठ नागरिकाला मारहाण केली आणि अपमानही केला. या मारहाणीचा आणि मारहाणीच्या नैराश्यातून नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याप्रकरणात आता पोलीस आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या केली. ज्ञानेश्वर साळुंखे असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, साळुंखे यांच्या घराशेजारी लग्न होते. हळदीचा कार्यक्रम असल्यामुळे स्पीकर लावण्यात आले होते. मात्र हार्ट पेशंट असलेल्या साळुंखे यांनी स्पीकरचा आवाज कमी करावा म्हणून विनंती केली होती. मात्र नवरदेव चेतन बेले आणि त्याच्या साथीदारांनी साळुंखे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. त्यांच्या मुलाच्या डोक्यात कोयत्याने वार केले होते. याची तक्रार देण्यासाठी साळुंखे कुटुंबीय पोलिसात गेले होते. मात्र तक्रार देऊन परत आल्यानंतर पोलिसात तक्रार का दिली म्हणून ज्ञानेश्वर साळुंखे यांना पुन्हा लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली होती. हा अपमान जिव्हारी लागल्याने साळुंखे यांनी बंडगार्डन येथील पुलावरुन नदीत उडी मारुन आत्महत्या केली.
दरम्यान ज्ञानेश्वर साळुंखे यांच्या आत्महत्यानंतर येरवडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत पाच जणांना अटक केली आहे. मात्र पोलिसात तक्रार दिल्यानंतर ही पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नाही. कारवाई करण्यात दिरंगाई केली आणि त्यामुळेच आरोपींनी पुन्हा ज्ञानेश्वर साळुंखे यांना मारहाण केली. यातून अपमानित झाल्यानेच साळुंखे यांनी आत्महत्या केली.
या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी हलगर्जीपणा केला, तक्रार आल्यानंतरही योग्य ती कारवाई केली नाही आणि म्हणूनच ज्ञानेश्वर साळुंखे यांना जीव गमवावा लागला अशी चर्चा सुरु आहे. त्यामुळेच सत्य काय आहे हे समोर येण्यासाठी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी या संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीत जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे आयुक्त रितेश कुमार यांनी सांगितले.
पाच जणांना अटक
पांडुरंग साळुंखे यांच्या तक्रारीवरुन येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर चेतन बेले (वय 26 वर्षे), देवेश ऊर्फ नन्या पवार (वय 18 वर्ष), यश मोहिते (वय 19 वर्ष), शाहरुख खान (वय 26 वर्ष), जय तानाजी भडकुंभे (वय 22 वर्षे) या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
संबंधित बातमी-