पुणे : पुण्यात घरफोड्या व वाहन चोरी करणारी 'बारक्या टोळी' ला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. पुणे शहरातील जवळपास सहा वेगवेगळे गुन्हे उघडकीस आले आहेत. पुणे पोलिसांकडून 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून सोन्याच्या दागिन्यांसह चार मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. 10 लाख 32 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने तर दोन लाख 40 हजार रुपयांच्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत, पृथ्वीराज उर्फ साहिल संतोष आव्हाड, आनंद लोंढे,आर्यन आगलावे,कुलदीप सोनवणे तसेच एका अल्पवयीन तरुणाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. 


घरफोडी आणि वाहन चोरी करणाऱ्या “बारक्या टोळीला “जेरबंद करण्यास गुन्हे शाखा युनिट 6 ला यश आले आहे. या टोळीकडून 10 लाख 32 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि दोन किलो वजनाच्या चांदीच्या विटा तसेच 2 लाख 40 हजार किमतीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या चार मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. बारक्या टोळीतील पृथ्वीराज उर्फ साहिल संतोष आव्हाड वय (19 वर्ष)आनंद उत्तरेश्वर लोंढे (34 वर्ष), आयर्न कैलास आगलावे (वय 18) कुलदीप गणपत सोनवणे( वय 19 वर्ष), एक विधी संघर्षित बालक यांना गुन्हे शाखा युनिट सहा कडून जेरबंद करण्यात आला आहे.


अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट सहा चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस हवालदार बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे,नितीन मुंडे,कानिफनाथ कारखेले, सुहास तांबेकर, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे,शेखर काटे, गणेश डोंगरे,समीर पिलाने, नितीन धाडगे,बाळासाहेब तनपुरे, म प व प्रतीक्षा पानसरे कीर्ति मांदले यांनी या टोळीला पकडलं आहे.