Pune crime news : पुण्यात गुन्हेगारी आणि गुन्हेगारांच्या दहशतीत वाढ झाली (Pune Crime) आहे. काजू कतली फुकट (firing) दिली नाही म्हणून स्वीट मॉलमध्ये गोळीबार करण्याचा प्रयत्न केला (crime news) गेला. पुण्यातील सिंहगड रस्त्यावर ही घटना घडली आहे. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला आणि आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. घडलेल्या या घटनेमुळे सिंहगड रोड परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथे मुख्य रस्त्यालगत फुलपरी स्वीटमार्ट आहे. याच दुकानात दोघांनी गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून गावठी पिस्तूल जप्त केले आहे. सोमवारी (20 डिसेंबर) ही घटना घडली आहे. दोघेही फुलपरी स्वीटमार्टमध्ये काजू कतली खरेदीसाठी आले होते. त्यांनी एक किलो काजू कतली घेतली. त्यानंतर दुकानदाराने त्यांना पैसे मागितले. पैसे देण्यासाठी नकार दिला. त्यानंतर दुकानदाराने पुन्हा पैसे मागितले. यावरुन दोघांमध्ये वाद झाला. काजू कतली खरेदीसाठी आलेल्या दोघांनी गावठी पिस्तुलातून गोळीबार करण्याता प्रयत्न केला. मात्र पिस्तुलातून गोळीबार झाला नाही. दोघांनी पुन्हा एकदा गोळीबार करण्याता प्रयत्न केला मात्र तोपर्यंत दुकानात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. ही गर्दी पाहून दोघांनी दुकानातून पळ काढला. 


खेळण्यातली बंदूक समजून दुकानदाराने केलं दुर्लक्ष
या घडलेल्या सगळ्या प्रकारानंतर दुकानात गर्दी केली होती. दुकानदारांनी ती खेळण्यातील बंदूक समजून दुर्लक्ष केलं होतं. मात्र व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांना या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला. त्यांनी दुकानाची पाहणी केली आणि सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले. त्यानंतर बंदूकीतून बाहेर पडलेली गोळी खरी असल्याचं समोर आलं. 


पोलिसांनी लगेच घेतला आरोपीचा शोध
घडलेल्या या प्रकरणाची पोलिसांनी पाहणी केली. त्यानंतर बंदूकीने मारलेली गोळी दुकानात सापडली ही गोळी खरी असल्याचं पोलिसांच्या पाहणीत स्पष्ट झालं. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेज चेक करत त्यांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. 


परिसरात भीतीचं वातावरण
पुण्यातील सिंहगड रस्त्यावर प्रचंड रहदारी असते. त्या परिसरात आतापर्यंत अनेकदा गोळीबार झाला आहे. मात्र क्षृल्लक कारणावरुन झालेल्या या गोळीबारांमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेमुळे गुन्हेगारांची दहशत पुण्यात कायम असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे.