पुणे: बदलापूरच्या एका नामांकित शाळेमध्ये सफाई कर्मचाऱ्याने दोन चिमुकल्या मुलींचं लैंगिक शोषण केल्याच्या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. या दरम्यान अशा अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. पुणे, अकोला, ठाणे येथे देखील अशाच पद्धतीने लैंगिक अत्याचाराच्या घटना उजेडात आल्या आहे. यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. अशातच पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार (Pune Crime News) केल्याची घटना समोर आली आहे, या प्रकारानंतर मित्रांसह पिडितेच्या मैत्रिणी विरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन तरुणीवर मैत्रिणीच्या मदतीने तिच्याच 2 मित्रांनी लैंगिक अत्याचार (Pune Crime News) केल्याचा प्रकार समोर आला आहे. अत्याचार करणारे अल्पवयीन तरुण पोलिसांच्या ताब्यात आहेत.अल्पवयीन तरुणीला मैत्रिणीनेच दारू पाजली त्यानंतर ती नशेत असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार (Pune Crime News) केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पुण्यात एप्रिल महिन्यात घडलेली ही घटना आता उघडकीस आली आहे.
पार्टीच्या निमित्ताने मित्राच्या घरी गेल्यावर अत्याचार
मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार एप्रिल महिन्यात घडला आहे. पीडित तरुणी आणि तिची मैत्रीण या दोघी एकमेकींच्या घराजवळ राहतात. त्यामुळे त्यांची पहिल्यापासूनच ओळख होती. आरोपी मैत्रिणीने पीडित तरुणीला घेऊन तिच्या मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी घेऊन गेली. पीडित तरुणीला रिक्षात बसवून मैत्रिण पार्टीसाठी तिच्या मित्राच्या घरी घेऊन गेली. तिथे बाकी मित्रांना देखील बोलावण्यात आलेलं होतं. (Pune Crime News)
याच पार्टीच्या दिवशी मित्राच्या घरी हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. पार्टीच्या ठिकाणी गेल्यावर पीडित तरुणीला तिच्या मैत्रिणीने जबरदस्तीने दारू पाजली आणि त्यानंतर आलेल्या मित्रांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार (Pune Crime News) केला. दारूच्या नशेत असलेल्या पिढीत तरुणीला या सर्व प्रकाराबाबत काहीच कल्पना नव्हती याचाच फायदा घेत एका तरुणाने या ठिकाणी या घटनेचा व्हिडिओ मोबाईलवर रेकॉर्ड केला.
चार महिन्यानंतर घटना आली समोर
चार महिन्यानंतर तिच्या वागणुकीत बदल दिसू लागल्यामुळे घरच्यांनी तिला प्रश्न विचारला असता हा सगळा प्रकार समोर आला आहे. पिडीत तरुणीच्या वडिलांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. समर्थ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक अल्पवयीन तरुणी आणि इतर मित्रांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार
बदलापूर,अकोला पाठोपाठ पुण्यात देखील अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे, पुण्यातील शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा (Pune Crime News) प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील भवानी पेठ भागातील नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी घडला आहे. पीडित मुलगी इयत्ता सातवीमध्ये शिकत आहे. आरोपी तरुण हा त्याच शाळेतील विद्यार्थी असल्याची माहिती आहे. या प्रकरणातील १९ वर्षीय आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर आपली चिमुरडी मुलं शाळेत देखील सुरक्षित नसल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे.