Pune Crime: मैत्रिणीच्या पतीने धमकावून तरुणीचा बलात्कार केल्याची घटना पुण्यात समोर आली आहे. सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून पैसे उकळल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. 22 वर्षीय सिद्धार्थ मधुकर श्रीखंडे आणि 23 वर्षीय आशिष विजय कांबळे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
मैत्रिणीच्या पतीने बलात्कार केल्यानंतर संबंधित तरुणीने तरुणीने चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर दोघांना पोलीसांनी अटक केली आहे.
आरोपी सिद्धर्थ हा संबंधित तरुणीच्या मैत्रिणीच्या पती आहे. त्याने तरुणीला प्रेमाची मागणी घातली तसा मेसेज केला आणि फिरायला घेऊन गेला. त्यानंतर सिद्धार्थने तरुणीवर बलात्कार केला.
फिरायला घेऊन गेल्यावर तरुणीचे काही व्हिडीओ आणि फोटो काढले. हे सगळे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत 17 हजार रुपयांची मागणीही केली. सिद्धार्थ आणि आशिषने संबंधित तरुणीला धमकी देण्यास सुरुवात केली. तरुणीला मारहाण करत पैशाची मागणी देखील केली. या दोघांच्या मानसिक त्रासामुळे तरुणीने पोलीसांकडे धाव घेतली.
पुण्यातील चंदन नगर पोलीस ठाण्यात तरुणीने धाव घेतल्यानंतर या दोघांनं चंदन अटक करण्यात आली आहे. या सगळ्या घटनेचा लवकरात लवकर तपास करुन संबंधित तरुणीला योग्य न्याय मिळेल, असं पोलीसांनी सांगितला आहे.
नक्की काय घडलं?
तरुणीच्या मैत्रिणीचा पती सिद्धार्थ आणि तरुणी काही कारणास्तवर तिघे भेटायचे. त्यानंतर त्यांची चांगली ओळख झाली. सिद्धार्थला संबंधित तरुणी आवडायला लागली. त्यानंतर त्याने पत्नी असूनसुद्धा त्या संबंधीत तरुणीकडे प्रेमाची मागणी केली. मला तू आवडते असं सांगत त्या तरुणीला फिरायला घेऊन गेला. त्यानंतर तरुणीचे फोटो, व्हिडीओ काढले. तिच्यावर बलात्कार केला. सिद्धार्थ आणि आशिष दोघांनी तरुणीला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिचा मानसिक छळ केला. त्यानंतर तरुणीने त्या दोघांविरोधात तक्रार दाखल केली. पोलीसांनी दोघांना अटक केली.