Pune Collector News: अवैध सावकारी रोखण्यासाठी पुणे प्रशासन अॅक्शन मोडवर आलं आहे. त्यासाठी सहकार विभागाने पोलीसांची मदत घेऊन स्वयंप्रेरणेने गुन्हे दाखल केले पाहिजे,  जास्तीत जास्त तपासणी करावी आणि योग्य पद्धतीने गुन्हे दाखल होतील याकडे लक्ष द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आहेत. त्यामुळे येत्या काळात पुणे सावकारी रोखण्यावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं दिसत आहे.


वैध सावकारीविरोधात तक्रारी करण्याच्या अनुषंगाने पिडीत नागरिकांनी पुढे येण्यासाठी व्यापक जनजागृतीची गरज आहे. तक्रारदारांमध्ये आपली दखल घेतली जाईल असा विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. सहकार विभागाला या कादद्याच्या अनुषंगाने व्यापक अधिकार असून व्याजाच्या पैशाच्या बदल्यात केलेली खरेदीखते रद्द करण्याचेही महत्वाानचे अधिकार या विभागाला आहेत. या अधिकारांचा उपयोग सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी करावा, असंही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले.


अवैध सावकारी विरोधात कारवाई करण्यासाठी सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीसांना माहिती देण्यात यावी. संबंधितांवर गतीने संयुक्तपणे कारवाई केल्यास अशा गैरप्रकारांना निश्चितच आळा बसेल. पोलीस विभागाकडून यामध्ये पूर्ण सहकार्य देण्यात येईल, असं उपआयुक्त घाडगे यांनी स्पष्ट केलं.


भरारी पथके नेमण्यात येणार


अवैध सावकारी रोखण्यासाठी सर्व तालुक्यात स्थायी भरारी पथके नेमण्यात आली आहेत. पोलीस, सहकार विभाग आणि महसूल विभागाच्या समन्वयाने यामध्ये काम सुरू आहे. हा गुन्हा यापूर्वी अदखलपात्र होता. मात्र आता कायद्यात दुरूस्ती करुन आता दखलपात्र करण्यात आल्यामुळे या गुन्ह्यांना  आळा बसला आहे. जिल्ह्यात परवाने असलेले 1 हजार 456 खासगी सावकार असून त्यापैकी 404 परवान्यांचे नूतनीकरण झाले असून 982 प्रलंबित आहेत. त्याबाबत गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश सहायक निबंधकांना दिले आहेत. पुणे जिल्ह्यात अवैध सावकारी  प्रचंड प्रमाणात केली जाते मात्र हे सावकार सर्रास अनेक पैशांची मागणी करतात. यावर नियंत्रण येण्यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत.