Pune Crime News: 12 वर्षीय मुलीच्या लग्नासाठी कुटुंबीयांनी नकार दिल्यामुळे दोन मुलाचे वडिल असलेल्या मुलाच्या नातेवाईकांनी मुलीही हत्या (Murder) करुन फाशी (Hang) दिल्याचा धक्कादायक प्रकार पुण्याजवळीत (pune) शिक्रापूर (shikrapur) येथे घडली आहे. मुलगा 35 वर्षांचा आहे आणि त्याला दोन मुले आहेत. आमच्या 12 वर्षीय मुलीने आत्महत्या केली नाही तिला फाशी दिली गेली, असा आरोप अल्पवयीन मुलीच्या पालकांनी केला आहे. शिवाय नातेवाईकांनी मुलीला तिच्या घरात घुसून मारलं आहे, असाही दावा केला आहे.



ही घटना 31 मेला शिक्रापूर शेजारील मोजे धामारी गावातील डफळवस्ती येथे घडली. मुलीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळल्यावर पोलिसांनी हा अपघात असल्याची नोंद केली होती. त्यांनी कुटुंबीयांची विचारपूस केल्यावर हत्या केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली.  याप्रकरणी प्राथमिक संशयित पंकज काळे आणि त्याचे कुटुंबीय मयूर काळे, अजय काळे आणि हैकन काळे यांना पोलिसांनी अटक केली आहे.


 'आम्ही आमच्या मुलीचे लग्न नातेवाईक असलेल्या व्यक्तीशी  करण्यास तयार नव्हतो. तिला शाळेत जायचं होतं पण तो आणि त्याच्या कुटुंबीयांकडून आम्हाला लग्नासाठी भाग पाडले जात होतं. आम्ही त्यांची ऑफर नाकारल्यामुळे त्यांनी तिला ठार मारले', असा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे.
 
ती सहावीत होती. माझ्या मुलीला उच्च शिक्षण घ्यायचे होते आणि तिला सरकारी नोकरी करायची होती. आम्ही तिला पाठिंबा दिला आणि तिच्या इच्छेचा सन्मान केला. आमच्या सर्व अपेक्षांचा चुराडा झाला आहे, अशा शब्दात तिच्या आईने दुख: व्यक्त केलं आहे. मी आणि माझे पती बाहेर असताना, चौघे आमच्या घरात घुसले. त्यांनी तिला मारलं. त्यानंतर त्यांनी आमच्या दुसऱ्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. आम्ही गरिब कुटुंब असल्याने पोलिसांनी आमची तक्रार गांभीर्याने घेतली नाही. त्यांनी आता चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. एवढं घडूनसुद्धा पोलिसांकडून कसून चौकशी केली जात नाही आहे, अशा शब्दांत तिच्या आईने संताप व्यक्त केला आहे.