Pune Cat News :  उपचारादरम्यान लाडक्या मांजराचा मृत्यू (cat) झाल्याने क्लिनिकची तोडफोड करत डॉक्टरांना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक (Pune Crime) प्रकार घडला आहे. पुण्यातील  हडपसर परिसरातील डॉग अँड कॅट क्लिनिकमध्ये 10 डिसेंबरच्या रात्री हा प्रकार घडला. या प्रकरणी एका महिलेसह चार व्यक्तींविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तक्रारदार यांच्या भाजी मंडई जवळील डॉग अँड कॅट क्लिनिकमध्ये उपचारासाठी मांजराला आणले होते. यावेळी उपचार सुरू असताना मांजराचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी 'मांजर कसे झोपले, आता तुला झोपवतो, तुझा दवाखाना बंद करतो" अशी धमकी दिली. त्यांना खाली पाडून एका महिलेसह पाच जणांनी लाथा बुक्क्यांनी डॉक्टरला बेदम मारहाण करत क्लिनिकची तोडफोड केली. डॉ. रामनाथ येण्याबापू ढगे असं डॉक्टरांचं नाव आहे.  


पाच जणांनी डॉक्टरला खाली पाडून लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत डॉक्टरच्या उजव्या पायाच्या घोट्याला गंभीर दुखापत झाली आहे. आरोपींनी डॉक्टरच्या यांच्या क्लिनिकमधील वस्तूंची देखील तोडफोड केली आहे. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.


डॉक्टरांनी घेतली पोलिसांत धाव
डॉ. रामनाथ येण्याबापू ढगे हे अनेक वर्षांपासून प्रॅक्टिस करत आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक प्राण्यांवर योग्य उपचार केले आहेत. त्यांच्याकडे मांजर उपचारासाठी आणलं होतं. त्या मांजरावर योग्य उपचार सुरु होते. मात्र याच उपचारादरम्यान मांजरीचा मृत्यू झाला. याचा मांजर पाळणाऱ्या कुटुंबियांना राग आला आणि त्यांनी डॉक्टरांना मारहाण केली. या सगळ्या घटनेनंतर डॉक्टरांनी पोलिसांनी धाव घेतली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार महिलेसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


दवाखान्याच्या सामानाचं नुकसान
हडपसर परिसरात भाजी मंडई जवळील डॉग अँड कॅट क्लिनिकमध्ये हा प्रकार घडला. त्यांनी मांजर पाळणाऱ्या कुटुंबियांनी डॉक्टरला मारहाण केली. त्यासोबतच त्यांच्या दवाखान्यातील सामानाची तोडफोड केली. यामुळे दवाखान्यातील सामानाचं मोठं नुकसानदेखील झालं आहे.


शेकडो पुणेकरांनी काढला मांजराचा परवाना 
पुण्यात अनेकांंच्या घरी मांजर पाळलं आहे. आता महापालिकेच्या आदेशानुसार मांजर पाळण्यासाठी परवाना घ्यावा लागणार आहे. आतापर्यंत शेकडो पुणेकरांनी मांजराचा परवाना काढला आहे. महापालिकेच्या या आदेशाचं पालन पुणेकर करताना दिसत आहे. मांजराबाबत प्रेम पुणेकरांनी अनेकदा व्यक्त केलं आहे. मांजराचं डोहाळजेवण, वाढदिवस जल्लोषात साजरे देखील केले आहेत. मात्र लाडक्या मांजराचा जीव गेल्यामुळे कुटुंबीय आक्रमक झाल्याची पहिलीच घटना समोर आली आहे.