पुण्यातील बिबवेवाडीत 12 ते 15 गाड्यांची तोडफोड, चौघेे ताब्यात
एबीपी माझा वेब टीम | 19 Jun 2016 05:33 AM (IST)
पुणे : पुण्यातील दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या जळीतकांडाच्या घटना ताज्या असतानाच गाड्या फोडण्याचं सत्रही सुरु आहे. पुण्याच्या बिबवेवाडीत 12 ते 15 गाड्या फोडल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत काही जणांनी वाहनांची तोडफोड केल्याची माहिती आहे. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतलं आहे. पुण्यात वारंवार घडत असलेल्या जळीतकांड आणि तोडफोडीच्या घटनांमुळे वाहनचालकांच्या मनात भीतीचं वातावरण आहे. दरम्यान पोलिस अधिक तपास करत आहेत.