पुणे: बारामतीमध्ये प्रशिक्षणादरम्यान झालेल्य विमान अपघाताची नोंद आता DGCA (Directorate General of Civil Aviation) ने घेतली असून कंपनीवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. वारंवार होणाऱ्या विमानाच्या विमान अपघातांची गंभीर दखल घेत रेडबर्ड एव्हिएशनवर (Red Bird Flight Training Centre) ही कारवाई करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत कंपनीने देशभरातील आपले कामकाज बंद करावे असे निर्देश देण्यात आले आहेत. 


बारामतीत शिकाऊ पायलटला विमान प्रशिक्षण दिले जातं. बारामती विमानतळावरील रेड बर्ड फ्लाईट ट्रेनिंग सेंटर अकॅडमीकडून हे प्रशिक्षण देण्यात येतं. मागच्या सहा महिन्यात पाच अपघात तर पंधरा दिवसात दोन वेळा अपघात झाल्याने या कंपनीवर आत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 


देशभरातील रेड बर्ड संस्थेचे कामकाज तात्काळ निलंबित करण्यात यावे असे आदेश सिव्हिल एव्हिएशनचे डायरेक्टर फोर फ्लाईंग ट्रेनिंग कॅप्टन अनिल गिल यांनी दिले आहेत. रेड बर्ड कंपनीच्या एका विमान अपघात झाल्याची नोंद डीजीसीनी घेत डीजीसींनी ही कारवाई केली आहे. या संदर्भात रेडबर्ड कंपनीला ई-मेल पाठवून तातडीने कामकाज पुढील आदेश येईपर्यंत निलंबित करत असल्याचे म्हटले आहे.


नेमकं काय घडलं? 


कटफल इथे वैमानिकांना प्रशिक्षण दिलं जातं. अनेक पायलट इथे विमान उडवण्याचं प्रशिक्षण घेऊन तयार होतात.  गेल्या काही दिवसापासून इथे जोरदार प्रशिक्षण सुरु आहे. पुणे आणि शेजारील जिल्ह्यातही या विमानांच्या घिरट्या पाहायला मिळतात. चार दिवसांपूर्वी असंच ट्रेनिंग सुरु होतं. या ट्रेनिंगदरम्यान कटफलमध्ये विमान कोसळलं. या अपघातात शिकाऊ पायलट शक्ती सिंग जखमी झाले आहेत. 


दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शिवाय स्थानिक नागरिकही अपघातस्थळी दाखल झाले. विमान कोसळलं त्या ठिकाणी झाडंझुडपं, गवत दिसत आहेत. अपघातग्रस्त विमान आकाराने छोटं होतं. पण या अपघातामुळे विमानाचं मोठं नुकसान झालं आहे. विमानाच्या पुढच्या भागाचा अक्षरश: चक्काचूर झाल्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. 


ही बातमी वाचा: