Ravindra dhangekar :  पोलिसांच्या कारवाईच्या (Pune Bypoll Election)  आश्वासनानंतर कॉंग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी उपोषण मागे घेतलं आहे. भाजपने  पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप केले असा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे त्यांनी कसबा गणपती मंदिरासमोर उपोषण केलं होतं. मात्र पोलिसांनी त्यांना कारवाईच आश्वासन दिलं त्यामुळे त्यांनी उपोषण सोडलं असं त्यांनी सांगितलं आहे.

Continues below advertisement


कसबा पोटनिवडणुकीच्या मतदानाला काहीच दिवस बाकी असताना पुण्यात मागील पैशांचा पाऊस पडत आहे. हे सगळं पोलिसांसमोर घडत आहे. या सगळ्या प्रकारावर पोलीस दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे आज लोकशाहीची हत्या होऊ नये यासाठी हे आंदोलन केलं होतं. यापुढे असे प्रकार घडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी आम्हाला दिली. त्यामुळे उपोषण मागे घेत आहे, असं ते म्हणाले.