पुणे: पुण्यात एका टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याने तो थेट अनेक गाड्यांना धडक देत सुटला आहे. चांदणी चौकातून कोथरुड डेपोकडे जाताना, एका उतारावर टेम्पोचा ब्रेक फेल झाला. त्यामुळे हा अपघात झाला.


 

या अपघातात एक जण जखमी झाला आहे. तर या टेम्पोने लोहिया जैन आयटी पार्कच्या शेजारी पार्क केलेल्या गाड्यांना धडक दिली आहे. यामध्ये 2 रिक्षा, 4 फोरव्हिलर्सला टेम्पोची धडक बसली आहे.