Sudhir Munghantiwar :  राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये या पुढे फोनवर बोलताना 'हॅलो' ऐवजी 'वंदे मातरम्'ने संभाषणाला सुरुवात होणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungatiwar) यांनी याबाबतची घोषणा केली त्यानंतर अनेक स्तरावरुन या निर्णयाबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. यात आता हिंदू महासंघाने देखील यात उडी घेतली आहे. या निर्णयाचं स्वागत करायला हवं, यावर उगाच टीका करु नका, अशी देखील भूमिका हिंदू महासंघानी व्यक्त केली आहे.


सगळ्या खात्यात हा निर्णय राबवल्या जाईल, असा निर्णय सुधीर मुनघंटीवार यांनी घ्यायला हवा. या बाबत एकाच मंत्र्याने निर्णय घेऊन चालणार नाही. तर केंद्रात देखील भाजपचं सरकार असल्याने त्यांनी देखील या निर्णयाचं स्वागत करायला हवं. जितेंद्र आव्हाडांनी यावर टीका केली कारण त्याच्या मतदार संघात सगळे मुस्लिम समाजाचे लोक राहतात. मात्र मुस्लिम समाजाच्या नागरीकांना याबाबत कोणताही आक्षेप नाही आहे. मात्र त्यांच्या नेत्यांचा या निर्णयाला आक्षेप असेल तर ते नेतृत्व टीकवण्यासाठी याबाबतचा आक्षेप घेत आहेत, असं मत ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी व्यक्त केलं आहे.


देशातला सगळा मतदार हा हिंदूत्ववादी झाला आहे. कोर्टाचे निर्णय देखील तसेच येताना दिसत आहे. गेले 70 वर्षात हिंदूंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता हे जनमत निर्माण झालं आहे. त्यामुळे हा निर्णय योग्य आहे. कोणाला यावर आक्षेप असेल तर त्यांनी तो उघडपणे दर्शवावा मात्र मतदार जागृक आहे. टीकेचं आम्ही स्वागत करतो, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं.


तर नाना पटोले म्हणतात जय बळीराम म्हणा...
नव्या सांस्कृतिक मंत्र्यांच्या या निर्णयावर आता काॅंग्रेसकडूनसुद्धा टीका होताना दिसते आहे. वंदे मातरम् ऐवजी जय बळीराम म्हणा, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. राज्यात शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. वंदे मातरम् हा स्वाभीमान  आहेच मात्र बळीराजा हा जगाचा पोशिंदा असल्याने जय बळीराजा म्हणा, असं आवाहन त्यांनी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना केलं आहे.