Pune Naxal movement: नक्षलवादी त्यांच्या चळवळीचा शहरी भागात विस्तार करण्यासाठी पुणे आणि जवळपासच्या औद्योगिक पट्ट्यांवर लक्ष केंद्रित करून आहेत का? या भागातील औद्योगिक पट्ट्यात कामगारांच्या रोषाला वाढवत औद्योगिक अशांततेला सामाजिक अशांततेत रूपांतरित करण्याचा नक्षलवाद्यांचा (Naxal) नियोजन आहे का? नक्षलवादी पुणे, नागपूर, ठाणे (Thane) सारख्या शहरातील झोपडपट्ट्यांकडे नवं रिक्रुटमेंट सेंटर म्हणून पाहत आहेत का? पुणेकर आणि संपूर्ण महाराष्ट्राची चिंता वाढवणारे हे प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे नुकतंच पुण्यात महाराष्ट्र एटीएसने प्रशांत उर्फ लॅपटॉप कांबळेला (Prashant Kamble) अटक केली आहे. (Lapto Kamble Naxal arrested in Pune)

Continues below advertisement

प्रशांत कांबळे गेली अनेक वर्ष पुणे आणि जवळपासच्या भागात गोपनीय पद्धतीने राहून नक्षलवाद्यांसाठी काम करत असल्याचे समोर आले आहे. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे प्रशांत उर्फ लॅपटॉप कांबळे 2011 मध्ये पुण्यातून अचानक बेपत्ता झाला होता, आणि त्याने गडचिरोतीच्या जंगलात सशस्त्र नक्षलवादाचा रीतसर ट्रेनिंग घेऊन मिलिंद तेलतुंबडे सारख्या टॉप नक्षल कमांडर सोबत अनेक वर्ष काम केले होते. आता तोच प्रशांत कांबळे गेले काही वर्ष पुण्यात कोणत्या उद्दिष्टाने राहत होता, काय करत होता, हे सर्व प्रश्न चिंता वाढवणारे आणि शहरी नक्षलवाद अगदी तुमच्या आमच्या दारापर्यंत बेमालूमपणे पोहोचला आहे का, असा भीतीदायक प्रश्न आता उपस्थित झाला आहे.  

कोण आहे प्रशांत उर्फ लॅपटॉप कांबळे?

* 2011पूर्वी पुण्यातील एका झोपडपट्टी मध्ये राहून कम्प्युटर्स आणि लॅपटॉप दुरुस्तीचा काम करत होता.* एका सांस्कृतिक मंचाच्या माध्यमातून थेट नक्षलवाद्यांपर्यंत पोहोचला.* नक्षलवाद्यांच्या कोरची कुरखेडा दरेकसा या KKD दलम मध्ये सहभागी होऊन शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण घेतले.* मिलिंद तेलतुंबडे सारख्या टॉपच्या नक्षल कमांडर सोबत अनेक एन्काऊंटर्स मध्ये सहभागी झाला. * प्रशांत कांबळे सोबत त्याच काळात संतोष शेलार नावाचा तरुणही पुण्यातून अशाच पद्धतीने बेपत्ता होऊन थेट नक्षलवाद्यांसोबत सहभागी झाला होता.* अनेक वर्ष जंगलातील नक्षलवाद्यां सोबत काम केल्यानंतर त्यांच्याकडून नवीन टास्क मिळवून प्रशांत कांबळे शहरी भागात परतला. पुण्यात भूमिगत राहून काम करू लागला.* तपास यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे प्रशांत कांबळे अनेक वर्षांपूर्वी जंगलातून विशेष टास्क घेऊन बाहेर पडला. * तेव्हापासून लॅपटॉप कांबळेने पुणे किंवा जवळपासच्या भागात कधी आदिवासी मुलांना शिकवण्याचे काम केले, तर कधी एखाद्या एनजीओमध्ये काम करत सामाजिक क्षेत्रात वावरला.* पुण्यात डिलिव्हरी बॉय म्हणून काम करून तो शेकडो पुणेकरांच्या घरापर्यंत ही सहज जात होता.

Continues below advertisement

पुण्यात प्रशांत कांबळेने नक्षलवाद्यांची मोठी फळी तयार केलेय का?

प्रशांत उर्फ लॅपटॉप कांबळे जंगलातून निघून पुणे परिसरात सक्रीय आहे, याची माहिती मिळाल्यामुळे गेले काही महिने महाराष्ट्राच्या नक्षलविरोधी पथकाने (ANO) त्याच्या नातेवाईकांच्या माध्यमातून त्याला आत्मसमर्पण करण्यासाठी अनेक वेळेला संपर्क केले होते, मात्र प्रत्येक वेळी त्याने आत्मसमर्पण करण्यास नकार दिले. कारण तो नक्षलवाद्यांच्या कडवट विचाराने प्रभावित होता आणि नक्षलवाद सोडायला तयार नव्हता. त्यानंतर त्याचा शोध घेत त्यावर पळत ठेवण्यात आली... आणि नुकतंच एटीएस ने त्याला अटक केली आहे. 

सध्या एटीएस आणि नक्षल विरोधी अभियानाचे पथक त्याची चौकशी करत असून तपास यंत्रणांना शंका आहे की प्रशांत उर्फ लॅपटॉप कांबळे पुणे, खोपोली, रायगड या भागातील औद्योगिक पट्ट्यात सक्रीय राहून पुणे - मुंबई दरम्यान च्या औद्योगिक पट्ट्यात नक्षलवादी विचारसरणी पेरण्याच्या जुन्या उद्दिष्टासाठी कार्यरत होता.. विशेष म्हणजे 2011 मध्ये एटीएसने पश्चिमी घाट परिसरात नक्षलवाद वाढवण्यासाठी खंडणी गोळा करण्याचा एक गुन्हा दाखल केला होता.. त्याप्रकरणी प्रशांत कांबळे ही वॉन्टेड होता आणि त्याच प्रकरणी एटीएसने त्याला अटक केली आहे. प्रशांत कांबळे सारख्या प्रशिक्षित नक्षलवाद्याच्या माध्यमातून नक्षलवादी पुणे सारख्या औद्योगिक क्षेत्रातील कामगारांमध्ये घुसखोरी करून शहरी नक्षलवादाची मोठी फळी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत का अशी शंका या घटनेनंतर निर्माण झाली आहे.    

आणखी वाचा

15 वर्षांपासून अंडरग्राऊंड! नक्षलवादी प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉप एटीएसच्या जाळ्यात कसा सापडला?