पुणे : मॅचफिक्सिंगचा भांडाफोड करणारे (Match Fixing) आणि सर्वात जास्त काळ नागपूरचे पोलीस (Nagpur Cp) आयुक्तपदी राहण्याचा विक्रम केलेले पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी पुणे पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्विकारला. हा पदभार स्विकारताना त्यांनी पुणेकरांना हेल्मेट न घातल्यास पुराव्यासहित कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पदभार स्विकारल्यानंतर लगेच ते हेल्मेट जनजागृती करताना दिसले.



कोण आहेत  अमितेश कुमार?


अमितेश कुमार हे भारतीय सेवा पोलीस 1995 च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत.अमितेश कुमार हे 2020 ते 2023 या कालावधीत  नागपूरचे पोलीस आयुक्त होते. त्यांनी मॅच फिक्सिंगचा प्रकार उघडकीस आणला होता. यात दाऊद इब्राहिम टोळीतील काही सऱ्हाईत सामील झाल्याचं लक्षात आल्यानंतर क्रिकेटच्या दुनियेत चांगलीच खळबळ उडाली होती. नागपूरमधील गुन्हेगारी थांबविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. 



पदभार स्विकारताच हेल्मेटबाबत जनजागृती


पुण्यातील वाहतूक स्थिती सगळ्यांनाच माहिती आहे. पुण्यात वाहतूक सुधारण्याचा अनेकांनी प्रयत्न केला मात्र हा प्रयत्न काही साध्य होताना दिसला नाही. अनेकदा पुण्यात हेल्मेट सक्ती करण्यात आली मात्र अजूनही  साधारण 50 टक्के पुणेकर हेल्मेट वापरताना दिसत नाही. शिवाय पुण्यात अपघाताची संख्या मोठी आहे. त्यामुळे शहरात हेल्मेट सक्ती करण्यात आली मात्र ती यशस्वी होताना दिसली नाही. अमितेश कुमार यांनी पदभार स्विकारतानाच थेट हेल्मेट न घातल्यास पुराव्यासहित कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे येत्या काळात पुण्यात हेल्मेट सक्ती होण्याची शक्यता आहे. 



अमितेश कुमार यांच्यासमोर कोणती आव्हानं?
  


पुण्यात सध्या गुन्हेगारीने कळस गाठला  (Pune Crime) आहे. भररस्त्यात कोयते हल्ल्यापासून ते अमली पदार्थांच्या विक्रीपर्यंत रस्त्यांवर गुन्हे घडताना दिसत आहे. शिक्षणाचं माहेरघर असलेलं पुणं ड्रग्जच्या विळख्यात अडकलं आहे. मागील दहा वर्षात जेवढ्या ड्रग्स कारवाया करुन ड्रग जप्त करण्यात आलं त्यापेक्षा 2023 या एका वर्षात सर्वाधिक किंमतीचं ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे. त्यासोबतच पुण्यात रोज नवनव्या टोळ्या रोज तयार होत आहे. त्या सोबतच भाईगिरी वाढत आहे. या सगळ्या गुन्हेगारीचा बिमोड करण्याचं आव्हान आता पुण्याचे नवे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासमोर असणार आहे. त्यासोबतच सायबर गुन्ह्यांतदेखील मोठी वाढ झाली आहे. या गुन्ह्यांकडे लक्ष ठेवून या गुन्ह्यांची उकल करणं, हे देखील त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे. 



इतर महत्वाची बातमी-


Pune Crime News : शिक्षकाकडून विद्यार्थीनीला 'I Love You' चा मेसेज; स्टाफ रुममध्ये बोलवलं अन्...; पुण्यात शिक्षणाला काळीमा फासणारी घटना समोर