पुणे : "प्रत्येकाला बोलण्याचा, आपला मुद्दा मांडण्याचा अधिकार आहे. राज ठाकरेंनी त्यांचा मुद्दा मांडला आणि मी माझा मांडला. राज ठाकरे यांचं काही नुकसान झालं नाही, मात्र मनसेचं एक मत गेलं," अशी प्रतिक्रिया अभिनेते नाना पाटेकर यांनी दिली आहे.


आज पुण्यातल्या एनडीएच्या दीक्षांत समारोहासाठी नाना पाटेकर उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंसह विविध विषयांवर मत मांडलं.

नाना पाटेकरांनी माहिती नसताना उगाच चोंबडेपणा करु नये : राज ठाकरे

मुंबईत फेरीवाल्यांचा मुद्दा ऐरणीवर असताना, अभिनेता नाना पाटेकर यांनी फेरीवाल्यांच्या बाजूने सूर आवळला होता. "भाकरीसाठी धडपडणाऱ्या फेरीवाल्यांच्या पोटावर पाय का देता," असा सवाल नाना पाटेकर यांनी उपस्थित केला होता.

नानांच्या या विधानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. "नाना पाटेकरांनी उगाच चोंबडेपणा करु नये, ज्या विषयाची माहिती आहे, त्याबद्दल बोलावं," अशा शब्दांत राज ठाकरेंनी नानांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता.

भाकरीसाठी धडपडणाऱ्या फेरीवाल्यांना का हटवता? : नाना पाटेकर

"महात्मा नाना पाटेकरांनी फेरीवाल्यांबद्दल काहीतरी वक्तव्य केलं. नानाला वाटतं तो चंद्रावरुन पडलाय, जेव्हा मराठी सिनेमांना स्क्रीन मिळत नव्हती तेव्हा नाना पाटेकर बोलले नाही, तेव्हा मनसेने लढा दिला," असं म्हणत राज ठाकरेंनी नानाची मिमिक्रीही केली.

या विषयी बोलताना नाना पाटेकर म्हणाले की, "राज ठाकरेंनी त्यांचा मुद्दा मांडला आणि मी माझा मांडला. पण राज ठाकरे यांचं काही नुकसान झालं नाही, मात्र मनसेचं एक मत गेलं."

मनसेचा प्रचार ब्ल्यू प्रिंटने, तर भाजपचा ब्ल्यू फिल्म दाखवून : राज ठाकरे

मनसेचं एक मत गेलं : नाना



व्हीजेटीआयच्या कार्यक्रमात नाना काय म्हणाले होते?



नानांच्या विधानावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया





ठाण्यातील सभेतील राज ठाकरेंचं संपूर्ण भाषण