पुणे : पुण्यातील सदाशिव पेठ हादरवून सोडणाऱ्या अॅसिड हल्ला आणि गोळीबार प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. विनायभंगाची तक्रार केल्याचा राग मनात धरुन मृत आरोपी सिद्धराम कलशेट्टीने हे कृत्य केल्याचं समोर आले आहे. रोहित थोरातच नाही तर संपूर्ण थोरात कुटुंबीय आपोरीच्या निशाण्यावर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.


सुरुवातीला अनैतिक संबंधातून हा सगळा प्रकार घडल्याची माहिती समोर आली होती. मात्र पोलिसांनी चौकशीत काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या. काही दिवसांपूर्वी रोहित थोरात याची आई आणि आरोपीची फेसबुकवर ओळख झाली होती. त्यानंतर आरोपीने रोहितच्या आईला अश्लील मेसेज पाठवले होते.


रोहितच्या आईने याबद्दल पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी सिद्धराम कलशेट्टी विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली होती. याच गोष्टीचा राग मनात ठेवून आरोपीने हे कृत्य केल्याचं पोलीस तपासात समोर आले.


VIDEO | पुण्यात तरुणावर अॅसिड हल्ला करुन गोळीबार

आरोपी सिद्धरामने रोहित थोरातवर हल्ला केला, मात्र संपूर्ण थोरात कुटुंब संपवण्याचा कट त्याने रचला होता. यासाठी तो पूर्ण तयारीनिशी याठिकाणी आला होता. पोलिसांना आरोपीच्या बॅगेत दोन मोठे कोयते आणि दोन चाकू आढळले आहेत.


पुण्यातील सदाशिव पेठेतील नवी पेठ येथे काल आरोपी सिद्धराम कमशेट्टी याने रोहित थोरात या तरुणावर अॅलिड हल्ला करत त्याच्या पाठीवर गोळी झाडली होती. हल्ल्यानंतर आरोपी सिद्धराम जवळील इमारतीत लपून बसला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने आरोपी सिद्धरामला इमारतीच्या डक्टमधून बाहेर काढलं. मात्र त्याआधीच पोलिसांच्या भीतीने आरोपींनी स्वत:वर गाळी झाडून आत्महत्या केली होती.