पुणे : पुण्यात अपघाताचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यातच(Pune Accident News) सिंहगड रोडवरील अपघाताची मालिका संपायचं नाव घेत नाही आहे. वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे चारचाकी गाडीने 3 महिलांना जोरदार धडक दिली आहे. पुण्यातील सिंहगड रोड भागात असलेल्या हिंगणे चौकात हा अपघात काल रात्री 8 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला आहे. अपघातात 3 महिला आणि 1 लहान मुलगा जखमी झाला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचा थरारक व्हिडीदेखील समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आनंद नगरकडे जाताना हिंगणे बस स्थानकाच्या जवळ चालकाचं चारचाकी वाहनावरील नियंत्रण अचानक सुटलं. दरम्यान हिंगणे बसस्टॉपवर उभ्या असलेल्या गाडीला चारचाकी धडकली. त्यानंतर या चारचाकीने थेट तीन महिलांना उडवलं. यात बाजूला उभ्या असलेल्या मुलालादेखील इजा झाली आहे. त्यानंतर सिंहगड रोडवर गोंधळ उडाला होता. अनेक नागरिक एकत्र जमले होते. अपघात होतान नागरिकांनी थेट रुग्णवाहिका बोलवून महिलांना आणि मुलांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या चारचाकी चालकाला नागरिकांनी अडवण्याता प्रयत्न केला मात्र चालक निघून गेला आहे. या चालकाचा शोध सध्य सुरु आहे.
सिंहगड रोडवर अपघात वाढले...
पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील किरकिटवाडी फाट्याजवळ अपघात झाला होता. भरधाव डंपरने ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीला धडक दिली होती. त्यानंतर दुचाकीवरील नवविवाहित तरुणीचा समोरुन येणाऱ्या टँकरखाली पडून जागीच मृत्यू झाला होता. अपघातात तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली गेली. शिवानी शैलेश पाटील असे या अपघातात मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव होतं. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले होतं. या तरुणीचा काही दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. ती आपल्या पतीसोबत गाडीवरुन कामाला जात होती. त्यावेळी ही घटना घडली होती.
पुण्यातील वाहनांचा घेत आहेत अनेकांचे जीव
पुणे आणि पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अपघाताच्या संख्येत चांगलीच वाढ झाल्याचं बघायला मिळालं आहे. त्यात डंपरची धडक लागून झालेल्या अपघातांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे हा डंपरचा वेग अनेकांच्या मृत्यूचं कारण बनत आहे. या सगळ्या वाहन चालकांच्या वेगावर ताबा घालण्याची गरज आहे. सिंहगड रोडवरील ज्येष्ठ नागरिकांनी या वाहनांच्या वेगासंदर्भात अनेकदा तक्रारीदेखील केल्या आहेत.
इतर महत्वाची बातमी-