पुणे : पुण्यातील रॅश ड्रायव्हिंगप्रकरणी (Pune Hit And Run) अल्पवयीन मुलाचे बदललेले ब्लड सॅम्पल (Blood Report) हे एका महिलेचे असल्याचं चौकशी समितीच्या अहवालात नमूद केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मात्र हे सॅम्पल मुलाच्या आईचे असल्याची चर्चा रंगली आहे.त्यानंतर आता अल्पवयीन मुलाच्या आईच्या रक्ताचे नमुने घेण्यात येणार आहे. ती महिला त्या अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल आहे की आणखी कोणी याचा तपास पुणे पोलिस करणार आहे.
कल्याणीनगर अपघातानंतर 19 मे रोजी वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने घेण्यात आले. मात्र, पोलिसांना नमुने देताना ससूनमधील डॉक्टरांनी दुसरेच रक्ताचे नमुने दिले होते. त्यामुळे त्या रक्तचाचणीत कोणताही दोष आढळून आला नव्हता. अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने ससुन रुग्णालयातील दोन डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर यांनी बदलले. मात्र, हे ब्लड सॅम्पल कुणाचे हा प्रश्न अनुत्तरित होता. अखेर या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने काल अहवाल सादर केला. त्यात मुलाचे रक्ताचे नमुने हे एका महिलेचे असल्याचं नमूद केल्याचं समजतं. त्यामुळे आता ती महिला त्या अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल आहे की आणखी कोणी याचा तपास पुणे पोलिस करणार आहे.
3 तारखेला शिवानी अग्रवाल निरीक्षणगृहात बोलवण्याची शक्यता
शिवानी अग्रवाल यांना अद्याप चौकशीसाठी बोलावण्यात आलेले नाही. गरज भासेल तेव्हा बोलावू असे पोलिसांकडून सांगण्यात येतेय.
4 तारखेला अल्पवयीन मुलाची निरीक्षण गृहातील कोठडी संपत असल्याने 3 तारखेला शिवानी अग्रवाल निरीक्षणगृहात मुलाच्या कोठडीतील सोपस्कार पार पाडण्यासाठी येऊ शकतात.
मुलाची आई बेपत्ता
पोलिसांकडून मुलाची आई शिवानी अग्रवाल यांची देखील चौकशी होणार असल्याचे समजते. त्यातच, आता शिवानी अग्रवाल बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. ड्रायव्हरला धमकूल्याप्रकरणी क्राइम ब्रांच टीमकडून शिवानी अग्रवाल यांचा देखील तपास करायचा आहे. त्यामुळे, पोलिसांचे पथक त्यांना ताब्यात घेईल, या भीतीने त्या सध्या बेपत्ता आहेत. तर, शिवानी अग्रवाल यांचा फोन देखील बंद आहे. त्यामुळे, मुलाची आई व विशाल अग्रवाल यांच्या पत्नी नेमकं कुठं गायब झाल्या, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
Video :
हे ही वाचा :
Pune Accident: अपघातानंतर शिवीगाळ करणारं रॅप व्हायरल, पण तो व्हिडीओ बिल्डरपुत्राचा नाही, पोलिसांचा दावा, आईही ढसाढसा रडली!